शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त वेलरासू यांची तडकाफडकी बदली, गोविंद बोडके नवीन आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 13:10 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी.वेलरासू यांची बदली केली.

डोंबिवली: गेल्या आठवडाभरापासून कल्याणमधील नागरिक आधारवाडी डंम्पिंगमुळे हैराण असल्याने अधिवेशनात तो मुद्दा गाजला. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी.वेलरासू यांची बदली केली. वेलरासू यांच्याजागी एम.जी. बोडके यांची नवे आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. 

गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत वेलरासू सत्ताधा-यांसमवेत महापालिकेच्या बजेट संदर्भात कामात व्यस्त होते, आणि त्यात शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम ‘लोकमत’ने वेलरासू यांची बदली झाल्याची माहिती दिल्याने सत्ताधा-यांसह सगळयांचीच तारांबळ उडाली. वर्षभरापूर्वी वेलरासू हे या महापालिकेत आयुक्त म्हणुन रुजु झाले होते, शुभारंभापासूनच त्यांना या ठिकाणी काम करण्यास स्वारस्य नसल्याची टिका सत्ताधारी शिवसेनेसह भाजपाने केली होती. म्हणुनच गेले वर्षभर या महापालिकेत कोणतीही विशेष विकासकामे झाली नाहीत. उलट या ठिकाणी घानेरडं शहर असा कलंक लावला गेल्याने सत्ताधा-यांवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही घाणेरडे शहर म्हणून डोंबिवलीचा उल्लेख केला होता. त्यापाठोपाठ आधारवाडी डम्पिंगला लागलेली आग या सर्व घटनाक्रमांमुळे वेलरासू यांची बदली करावी अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी अधिवेशनात केली होती. अखेर झालेही तसेच शुक्रवारी सकाळीच वेलरासू यांची बदली झाल्याची ऑर्डर वा-यासारखी पसरली.

अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी काढलेल्या आदेशाद्वारे वेलरासू यांची बदली करण्यात आली असून ते आता राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक म्हणुन कारभार सांभाळणार असल्याचे त्या आदेशात नमूद केले आहे. तातडीच्या तत्वावर नवा पदभार स्विकारावा असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका