शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली : मतदारसंघ खेचाखेचीत मैदानांकडे मात्र दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून तसेच जागा वाटपावरून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून तसेच जागा वाटपावरून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या वादात प्रचारसभांसाठी मैदाने आरक्षित करण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराला फारच कमी दिवस मिळणार असताना मैदान आरक्षित करण्यासाठी अद्यापपर्यंत एकच अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कल्याण परिक्षेत्रात कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघाचा भाग येतो. लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेची निवडणूक असो ती जाहीर होताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील मैदाने प्रचारासाठी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू होते.केडीएमसी हद्दीचा आढावा घेता डोंबिवली पश्चिमेत भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड), फडके मैदान तर, पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, अशी मोठी मैदाने आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने फक्त खेळासाठी राखीव आहेत. परंतु, अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी प्रशासनाकडून निर्णय घेतला जातो.विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबरला, तर मतमोजणी २४ आॅक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत.७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु, २१ तारखेला मतदान असल्याने १९ तारखेलाच सायंकाळी प्रचार थांबवावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल.मैदाने, सभागृहांसाठी नियमावली जाहीरसभेसाठी मैदाने आरक्षित करण्यासाठी ४८ तास अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. याआधीच अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, सभा अथवा कार्यक्रम संपल्यानंतर दुसºया दिवशी सकाळपर्यंत रिकामे करून देणे बंधनकारक राहील.एका अर्जदाराला संपूर्ण निवडणूक कालावधीत कुठलेही एक मैदान दोन वेळेस उपलब्ध करून दिले जाईल.सर्व अर्ज मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रातच स्वीकारले जातील. इतर कुठल्याही विभागात अथवा कार्यालयात अर्ज केल्यास स्वीकारला जाणार नाही.प्रथम प्राप्त झालेल्या अर्जास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, दोन अर्जदार अथवा पक्षाने एकाच वेळी एकाच मैदानाची मागणी केल्यास आयुक्तांचा निर्णय अंतिम राहील.लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत मैदानांचे भाडे लागू राहील आणि त्यावेळी उपलब्ध करून दिलेली मैदानेच यावेळी दिलीभाजपकडूनएकमेव अर्जडोंबिवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार सभेसाठी भाजपकडून पश्चिमेतील भागशाळा मैदानाची मागणी करण्यात आली आहे. ४ ते ६ आॅक्टोबर, ११ ते १३ आॅक्टोबर आणि १८, १९ आॅक्टोबरला मैदान उपलब्ध व्हावे, असा अर्ज महापालिका मुख्यालयात देण्यात आला आहे.खाजगी मैदानावरच भिस्तकल्याण पूर्व मतदारसंघात केडीएमसीचे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण हे एकमेव मैदान आहे. परंतु, प्रचाराच्या सभेसाठी ते पुरेसे नाही. त्यामुळे तेथील पोटे नामक खाजगी मैदानच प्रचारासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचारासाठी राजकीय पक्षांना संपूर्णपणे याच मैदानाचा आधार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीdombivali-acडोंबिवली