शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

कल्याण, डोंबिवली ‘गॅसवर’

By admin | Updated: January 4, 2016 02:00 IST

येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी हा प्रत्यय पुन्हा एकदा आला. काही दिवसांपूर्वी दिवा येथे डम्पिंगवर रसायने जाळल्याने लोकांना त्रास झाला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर गॅस चेंबर झाले आहे. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ५५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही या ठिकाणी बेकायदाकचरा टाकणे सुरूच आहे. याबाबत, सुरू असलेली बेपर्वाई पाहता मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला चांगलेच फटकारले असून एका याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला महापालिकेने आता सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावरील निर्णय प्रलंबित आहे. एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच राहिल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. शनिवारी पुन्हा एकदा या डम्पिंगच्या कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली. ही आग बराच वेळ धुमसत होती. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन क रावा लागला. बराच वेळ धुमसत असलेल्या या आगीमुळे निर्माण झालेला धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात गेल्याने रहिवाशांचे हाल झाले. हा धूर आधारवाडीसह वाडेघर, लालचौकी, पारनाकापर्यंत पसरला होता. यात रहिवाशांसह पादचाऱ्यांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे लागले. या सतत होणाऱ्या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काहींनी तर या परिसरातून अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी एकदा येऊन परिस्थिती पाहावी, जेणेकरून नागरिकांना होण्याऱ्या त्रासाची जाणीव त्यांना होईल, असा संतापही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. याबाबत, वाडेघर परिसरातील रहिवासी असलेले अजय पाटील म्हणाले धुरकट परिस्थिती ही कायमची असून माझ्या दोन्ही लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होत आहे. धुरामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून येथील जागा सोडून दुसरीकडे जाण्याच्या आम्ही विचारात आहोत.