शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कळवा पोलिसांनी नागरिकांना केले ६० मोबाईल परत

By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2023 21:58 IST

पोलिस उपायुक्तांच्या हस्ते वाटप: चार लाख ५६ हजारांच्या मोबाईलचा लागला शोध.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा परिसरातून नागरिकांचे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हरविलेल्या अशा चार लाख ५६ हजार ८५० रुपयांच्या ६० मोबाईलचा शोध घेण्यात आला आहे. हे सर्व मोबाईल पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते शुक्रवारी संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

कळवा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल २०२२ आणि २०२३ या वर्षात हरविले होते. यात काहींचे माेबाईल हे प्रवासात तसेच इतरत्र गहाळ झाले होते. तर काहींचे ते चोरीस गेले होते. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया ोथाेरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कुंवर, उपनिरीक्षक किरण बघडाणे, विजय गोऱ्हे , पोलिस अंमलदार नामदेव कोळी, प्रशांत लवटे आणि स्वप्नील खपाले आदींच्या पथकाने या मोबाईलच्या शोधासाठी विशेष कामगिरी बजावली. या मोबाईलची सविस्तर माहिती सीईआयआर या केंद्र सरकारच्या अॅपमध्ये भरण्यात आली होती. त्यानंतर या मोबईलवर तांत्रिक पद्धतीने, बारकाईने विश्लेषण करीत हरविलेल्या मोबाईलच्या पत्त्यांबाबतची माहिती काढण्यात आली.

संबंधित ठिकाणी जाऊन हे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. गहाळ मोबाईल मिळाल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली होती. ज्यांच्या हाती लागले, त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले. हेच सर्व मोबाईल ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी संबंधित तक्रारदार यांना पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचे निरीक्षक थाेरात यांनी सांगितले. आपले मोबाईल सुखरुप मिळाल्यांनतर मोबाईलधारकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिसkalwaकळवा