शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कळवा अपघात : कंटेनरचालकाला पुण्यातून अटक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 22:49 IST

खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे अजय शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंद्रकांत तुपे (४९) याला पुण्यातून शनिवारी कळवा पोलिसांनी अटक केली.

ठाणे, दि. ३१ -  खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे अजय शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंद्रकांत तुपे (४९) याला पुण्यातून शनिवारी कळवा पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर त्याने दुचाकीचालकाला सुमाने तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. त्यातच अजय याचा मृत्यू झाला. सुमारे १०० सीसीटीव्हीतील चित्रणांची तपासणी केल्यानंतर तुपेला पकडण्यात पोलिसांना यश आले.विवियाना मॉलसमोरील पादचारी पुलाच्या खाली शर्माचा १८ जुलै रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह मिळाला होता. हा खून, आत्महत्या की अपघात, असा संभ्रम वर्तकनगर, कापूरबावडी आणि राबोडी पोलिसांसमोर निर्माण झालेला होता. त्याच वेळी खारेगाव टोलनाक्याजवळ दुचाकीवरील या चालकाला वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान, संजीव पाटील, तुकाराम पावले, अशोक उतेकर आणि राबोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रासम आदींची वेगवेगळी पथके तयार केली. खारेगाव टोलनाका ते मुलुंडच्या मॉडेला चेकनाका तसेच घटनास्थळासमोरील इमारती तसेच इतर ठिकाणचे अशा सुमारे १०० सीसीटीव्हींची या पथकांनी पडताळणी केली. त्या वेळी मॉलसमोरील एका चित्रणात एका कंटेनरला एक व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. हा कंटेनर तिथून गेल्यानंतर मॉडेला चेकनाका परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये हाच कंटेनर आढळला. लोखंडी गार्ड तुटलेले, सिद्धिविनायक नाव आणि क्रमांक अस्पष्ट इतकेच वर्णन मिळाल्यानंतर या तुपे या कंटेनरचालकाला कंटेनरसह कळवा पोलिसांनी २९ जुलै रोजी पुण्यातून ताब्यात घेतले. अपघातानंतर गाडी थांबवली, तर नागरिक मारतील, या भीतीने गाडी तशीच दामटल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. असा झाला अपघातअजय आणि त्याचा मित्र अजिंक्य शर्मा (२८, मूळचे दोघेही राहणार हिमाचल प्रदेश) हे दुचाकीवरून मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव प्रवेशद्वाराजवळून जात होते. त्यांना समोरून येणाºया एका वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात अजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. तर, अजिंक्यलाही मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. अजय मात्र घोडबंदर रोडवरील एका मॉलसमोरील स्कायवॉकखाली राबोडी पोलिसांना मिळाला.