शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कलानी गटाचा भाजपला धक्का?; सात नगरसेवक संपर्काबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 04:05 IST

उल्हासनगर महापौर निवडणूक; राजकीय हालचालींना वेग

- सदानंद नाईकउल्हासनगर : आधी महापौरपदावरून आणि नंतर आमदारकीवरून झुलवत ठेवत राजकीयदृष्ट्या कोंडी केलेल्या ओमी कलानी गटाने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ देत भाजपला धक्का देण्याची तयारी केल्याने सत्ताधारी भाजपच्या गोटात चिंता पसरली आहे. साई पक्षाच्या १० सदस्यांचे विलीनीकरण करून भाजपने कलानी गटाचा डाव उधळण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यानंतरही साई पक्षाचे जीवन इदनानी आणि एक नगरसेवक पक्षाची वेगळी चूल टिकवून आहेत. या तडजोडीच्या बदल्यात ईदनानी महापौर झाले, तरी ते पद साई पक्षाकडे जाते आणि शिवसेनेच्या लीलाबाई आशान महापौर झाल्या तर भाजपच्या हातातून पालिकेची सत्ता जाते, अशी चुरशीची स्थिती उल्हासनगरमध्ये निर्माण झाली आहे.मनोज लासी या स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेत ओमी कलानी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता होईल. भाजपने जमनुदास पुरस्वानी आणि जीवन इदनानी यांना, तर शिवसेनेने लीलाबाई आशान यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून विजय पाटील व साई पक्षाचे टोनी सिरवानी, तर शिवसेनेकडून रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी अर्ज भरला आहे.संख्याबळाचे हेलकावेबहुमतासाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. महापालिकेत भाजपचे ३१, साई पक्षाचे १२ असे ४३ नगरसेवक आहेत. तर विरोधात शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँगे्रस, भारिप व पीआरपी यांचे प्रत्येकी एक असे ३५ नगरसेवक आहेत. इदनानी यांनी महापौरपदाची अट घालत साई पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे. भाजपच्या ३१ नगरसेवकांपैकी ओमी कलानी गटाचे ११ नगरसेवक आहेत. ते फुटण्याची शक्यता असल्याने आणि त्यातील सात नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या गटाने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी केली असून तसे झाले, तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४६ होईल आणि भाजप समर्थकांची संख्या घटून ३२ होईल, असा विरोधकांचा दावा आहे.सर्व नगरसेवक शहराबाहेर : महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून सर्वच पक्षांचे नगरसेवक शहराबाहेर आहेत. ते थेट उद्या निवडणुकीवेळी सभागृहात हजर होणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा