शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By अजित मांडके | Updated: January 27, 2024 16:06 IST

मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे : काही दिवसांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयत्ती झाली, त्यानंतर आज स्वर्गीय आनंद दिघे यांची जंयत्ती आहे, आज त्यांच्या जंयत्तीच्या निमित्ताने मराठा समाजाला सरकाराने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले.  

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची शनिवारी सर्वत्र जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने ठाणे येथील खारकर आळी भागातील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन उपस्थितांची संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी आनंद आश्रम येथे जाऊन दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन आर्शिवाद घेतले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे उपस्थित होते. आनंद दिघे यांची जयंती आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो. समाजास उपयुक्त असे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करतो. दिघे यांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे, त्या आदर्श मागार्ने आपण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या जयंती दिवशी आपण मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गेले अनेक वर्षे सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या मराठा समाजाला दिघे यांच्या जयंती दिवशी आपण न्याय दिला आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दिला आहे. मराठा समाज सवलती पासून आजपर्यंत वंचित होता. परंतु त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकारने केले, याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

आनंद दिघे यांच्या नावाने योजनामहाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व प्रस्तावित योजनांमध्ये सबसिडी योजना आहे. त्याला धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना असे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. दिघे यांनी समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केले. सर्व समाजाला आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याचे मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दिघे यांची होती. त्यांच्या दरबारात समस्या घेऊन येणारा हसतमुखाने परत जात होता. म्हणूनच त्यांच्या नावाची योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहे आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता अशा प्रकारच्या लाभाची योजना समर्पित करण्यासाठी ही योजना आहे. दिघे यांनी आपले जीवन संपुर्णपणे लोकसेवा आणि दिघे यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षण