शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दिड तासातच ठाण्यात दोन महिलांच्या सोनसाखळयांची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:16 IST

ठाणे शहरात लुईसवाडी आणि तत्वज्ञान विद्यापीठ चौक अशा दोन ठिकाणी मंगळवारी एकाच दिवशी अवघ्या दिड तासाच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे जबरीने चोरीचे प्रकार घडले. याप्रकरणी वागळे इस्टेट आणि चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट आणि चितळसरमधील प्रकार मॉर्निंग वाक करणाऱ्यांमध्ये घबराट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एरव्ही, दोन तीन दिवसांनी घडणारे सोनसाखळी जबरी चोरीचे प्रकार आता काही तासांवर घडू लागले आहेत. शहरात लुईसवाडी आणि तत्वज्ञान विद्यापीठ चौक अशा दोन ठिकाणी मंगळवारी एकाच दिवशी अवघ्या तासाभराच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे हिसकावण्याचे प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.वागळे इस्टेट, लुईसवाडी सिद्धार्थनगर भागात राहणारी ६६वर्षीय महिला २९ सप्टेंबर रोजी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडली. ती ५.२० वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक अशोक बोरीटकर यांच्या कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन घरी परत जात होती. त्याचवेळी एका काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेले दोघेजण तिच्याजवळ येऊन थांबले. त्यांनी ‘मावशी जैन मंदिर कोठे आहे’? अशी त्यांना विचारणा केली. तेंव्हा आपल्याला जैन मंदिर माहित नसल्याचे ती सांगत असतांनाच मोटारसायकलवरील मागे बसलेल्याने तिच्या गळयातील सुमारे दोन तोळयांचे ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाले. नंतर तिला धक्का देऊन तिथून पलायन केले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा या महिलेने दाखल केला आहे.* दुस-या घटनेत तुळशीधाम भागातील ५४ वर्षीय महिला तिच्या पतीसह रिक्षाने २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास आशापुरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पाच हजारांचे सोन्याचे पँन्डल असा ३५ हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी