शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

बॅण्डबाजातून अवघी १० टक्के वसुली

By admin | Updated: March 22, 2016 02:12 IST

पालिकेच्या कर विभागाने एकूण १९० कोटींच्या करवसुलीपैकी १० महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली केली आहे. त्यानंतर, सक्तीच्या वसुलीसाठी २६ फेब्रुवारीपासून बॅण्डबाजा वाजवत कर वसूल करण्याची संकल्पना

भार्इंदर : पालिकेच्या कर विभागाने एकूण १९० कोटींच्या करवसुलीपैकी १० महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली केली आहे. त्यानंतर, सक्तीच्या वसुलीसाठी २६ फेब्रुवारीपासून बॅण्डबाजा वाजवत कर वसूल करण्याची संकल्पना अमलात आणली. त्यातूनही २१ दिवसांत अवघी १० टक्केच वसुली झाली. पुढील थकीत वसुलीसाठी अभय योजनेऐवजी मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्याची चर्चा कर विभागात सुरू झाली आहे. पालिकेचे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या मालमत्ताकरासाठी मागील अंदाजपत्रकात १९० कोटींचे उद्दिष्ट कर विभागाला दिले होते. परंतु, कर विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान केवळ ४० टक्केच वसुली झाल्याचे उघड झाले होते. ही वसुली चिंताजनक असल्याने आयुक्त अच्युत हांगे यांनी कर विभागाला थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासह मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा आदेश दिला होता. परंतु, कर विभागाने ठाणे पालिकेच्या धर्तीवर बॅण्डबाजा घेऊन कर वसूल करण्याची संकल्पना राबवली. त्यासाठी एकूण सहा प्रभागनिहाय बॅण्ड पथकांचे नियोजन करून २६ फेब्रुवारीपासून याला सुरुवात झाली. त्याला प्रतिसाद मिळत असतानाच काही करबुडव्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बॅण्डच्या आवाजाचा त्रास होत असल्याचा कांगावा करून कर भरण्यापासून पळ काढण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याला फारसे न जुमानता कारवाई सुरू राहिली. कर विभागाच्या पथकांनी बॅण्ड वाजवून केलेल्या कारवाईत २१ दिवसांत एकूण करवसुलीत १० टक्कयांनी वाढ झाली, असे कर विभागाकडून सांगण्यात आले.