शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या बदल्यांमधील सेवा जेष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे न्यायायलीन आदेश; १० मेला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:45 IST

  कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नी एकत्रीकरणाच्या बदलीसाठी देखील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन या निकषाचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधीत शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यातही तीव्र संताप आहे. याकडे देखील सीईओ यांच्यासह शिक्षणाधिकाऱ्यानी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आॅनलाइन बदल्यांचा हा घोळ पुन्हा वाढत जाण्याची शक्यता काही जाणकार शिक्षकांकडून सांगितली जात आहे.

ठळक मुद्दे१० मे रोजी पहिली सुनावणी विभागीय आयुक्तालयांच्या दालनात पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन घोळ या आधीच लोकमतने उघड केलेला आहे

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिकशिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सुमारे दोन महिन्यापूर्वी झाल्या. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी विभागीय आयुक्तालयांच्या दालनात होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनावणे यांनी लोकमतला सांगितले.कोकणातील ठाणेसह, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सेवा जेष्ठता असलेल्या शिक्षकांना प्राधान्याने जवळच्या शाळेवर बदली होणे अपेक्षित होते. मात्र ही सेवा जेष्ठता डावलल्याने संबंधीत शिक्षकाना प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही. यामुळे या पाच ही जिल्हह्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सुनावणी होऊन विभागीय आयुक्ताना या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले आहेत. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांकडे पहिल्या टप्यातील सुनावणीचे नियोजन १० मे रोजी करण्यात आले आहेत.या ऑनलाइन बदल्यांमधील झालेला घोळ या आधीच लोकमतने उघड केलेला आहे. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी संबंधीत सीईओंना शिक्षकांच्या तक्रारींची सखोपणे चौकशी करून अभिप्राय देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यावर अजून काम सुरूच आहे. त्यातील घोळ मिटण्या आधीच सेवा जेष्ठतेचा विचार न करता शिक्षकांच्या नको असलेल्या ठिकाणच्या शाळांवर बदली करण्याचा पराक्रम करण्यात आला. या प्रमाणेच शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी ठाणे सीईओंनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन चौकशी करण्यास भाग पाडले आहेत. पण त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ संवर्ग १ व २ नुसार बदली झालेल्या शिक्षकांचे कागदपत्रे तपासणीसाठी मागीतले. या तपासणीतून सर्वाधिक व प्रशासनाची फसवणूक झालेले संवर्ग तीन व चारच्या बदलीसाठी वापरलेले कागदपत्रे तपासणी शिक्षणविभागाने सोयीस्कररित्या टाळले जात असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.      कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नी एकत्रीकरणाच्या बदलीसाठी देखील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन या निकषाचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधीत शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यातही तीव्र संताप आहे. याकडे देखील सीईओ यांच्यासह शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ऑनलाइन बदल्यांचा हा घोळ पुन्हा वाढत जाण्याची शक्यता काही जाणकार शिक्षकांकडून सांगितली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा