शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड राज्याचा चेहरा बदलतील, शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 00:07 IST

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले.

ठाणे : कर्तृत्ववान लोकांना साथ दिली तर समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास वेळ लागत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी हे दाखवून दिले आहे. आज कळव्यात दिसणारे विस्तीर्ण रस्ते, येथील विकासकामे ही त्याची पावती आहे. आव्हाने स्वीकारली तर लोक कधीच विसरत नाहीत. त्यांनी आव्हाने स्वीकारल्यामुळेच ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती होती, तिथेच त्यांना अधिक मताधिक्य मिळाले. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकते. अशीच साथ त्यांना द्या; तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, महाराष्ट्राला देशामध्ये प्रथमक्र मांकावर नेण्यासाठी मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले.उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले. येथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, ठाणेकर भाग्यवान आहेत की, त्यांना असे दोन मंत्री मिळाले आहेत; ज्यांच्या कामांतून महाराष्ट्र बदलेल. आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास या खात्यांमुळे सबंध महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला परवडणारी घरे मिळतील, याची आपणाला खात्री असल्याचे पवार म्हणाले.जिथे कर्तृत्व असते, त्या कर्तृत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नांची सोडवणूक करणारे नेतृत्व उभे राहू शकते. आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिले आहे. मागील अनेक वर्षे ठाण्यातच नव्हे, तर ठाण्याच्या बाहेर सबंध महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल, त्याचा यांनी नेहमीच पुरस्कार करून स्वत:चे एक स्थानही प्रस्थापित केले आहे. एक लोकप्रतिनिधी जागृत असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकते, हे तुम्ही कळवा-मुंब्य्रामध्ये जाऊन पाहा, असे आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून, तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा.मी तुम्हाला खात्री देतो की, हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील लोकांच्या जीवनात बदल करण्यातही यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे, असे ते यावेळी पुढे म्हणाले.नव्या पिढीला घडवाशरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगितले की, मुंबईत आल्यानंतर आपण तरु णांच्या चळवळीत काम करीत होतो. त्यावेळी एका मंचावर माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मला बोलावून घेतले आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठे केले. तेव्हापासून मी मोठा होत गेलो.मला आव्हाड आणि शिंदे यांना या ठिकाणी सांगावेसे वाटते की, नव्या पिढीतील लोकांना घडविण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना संधी द्या; त्यांच्यातील कर्तृत्व ओळखून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांना सोबत घ्या. तुम्ही नक्कीच महाराष्ट्राला प्रथमस्थानी नेऊन ठेवाल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड