शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad: मंत्रीपद जाताच आव्हाड रस्त्यावर, बायपासवरील खड्डे अन् सळया पाहून संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:22 IST

Jitendra Awhad: राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला

ठाणे - पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे मंत्रीपद गेल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडही थेट रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालक व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. तर, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हेही रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. सोमवारी त्यांनी मुंब्रा बायपासवरील खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली.  ''आज मी स्वत: मुंब्रा बायपासची पाहणी केली. मुंब्रा बायपासच्या रेतीबंदर पट्ट्यामध्ये जिथून बायपास उतरायला सुरुवात होते तिथे तीन मोठे खड्डे पडलेले आहेत व खालील सळ्या देखील दिसत आहेत. याप्रकरणी मी गेले दोन दिवस संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलत आहे. काम सुरु करु असे त्यांनी आश्वासन दिले होते. अजूनही काम सुरु झालेले नाही. ह्या कामाला उशीर झाला तर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो अशी मला शक्यता वाटते. तरी त्वरीत या कामाला सुरुवात करायला हवी'', असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे, आपले मंत्रीपद सोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राroad safetyरस्ते सुरक्षा