शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जप्तीच्या कारवाईमुळे बिल्डर झोजवालांची आत्महत्या, एमसीएचआयचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:55 IST

कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसीफ झोजवाला (५६) यांच्यावर ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकी वसुलीकरिता जप्तीची कारवाई केल्यानेच त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कल्याणमधील एमसीएचआयच्या पदाधिका-यांनी केला.

कल्याण - कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसीफ झोजवाला (५६) यांच्यावर ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकी वसुलीकरिता जप्तीची कारवाई केल्यानेच त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कल्याणमधील एमसीएचआयच्या पदाधिका-यांनी केला. झोजवाला यांच्या आत्महत्येकरिता बिल्डर संघटना केडीएमसी प्रशासनाला जबाबदार धरत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मौन धारण केले आहे, तर केडीएमसीने हा आरोप फेटाळून लावला आहे. एमसीएचआयचे कल्याणचे अध्यक्ष मनोज राय हे झोजवाला यांच्या आत्महत्येच्या घटनेची वार्ता समजल्यापासून इस्पितळात दाखल आहेत, अशी माहिती एमसीएचआयचे सदस्य रवी पाटील यांनी दिली. एमसीएचआयचे सदस्य बुधवारी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजाही ठोठावणार आहेत. झोजवाला यांच्या आत्महत्येबाबत दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. झोजवाला यांच्या आत्महत्येमागील विविध कारणांची पोलीस पडताळणी करत आहेत.मुरबाड रोड परिसरात झोजवाला यांचा ‘राणी मॅन्शन’ हा बंगला आहे. याच बंगल्याच्या गच्चीवर सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. शवविच्छेदन रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आले.आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी झोजवाला कॉफी प्यायले. दुपारी ४च्या सुमारास बंगल्याच्या गच्चीवर येरझारा करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. त्यानंतर, त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगळवारी झोजवाला यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. टिटवाळा येथील जागेच्या वादासंदर्भात झोजवाला यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जायचे होते.मनमिळाऊ स्वभावाचे झोजवाला हे भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी जिल्ह्याचे कोषाध्यक्षपद भूषवले होते तसेच ते एमसीएचआयचे सदस्य होते.मानसिक तणाव हेच कारण?गेल्या वर्षभरात नोटाबंदीसह घेण्यात आलेल्या निर्णयाचा बांधकाम व्यवसायावर विपरित परिणाम झाला होता. त्यामुळे बाजारात आलेल्या मंदीमुळे नवीन घर घेणाºया ग्राहकांची संख्या घटल्याने बांधकाम व्यवसायाला अवकळा प्राप्त झाली. पालिकेला घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याने उच्च न्यायालयाने दोन वर्षे नवीन विकासकामे करण्यास बंदी घातली होती.ती उठवण्यात आली. त्यापाठोपाठ नोटाबंदीचा फटका बसला. त्यापाठोपाठ आलेला महारेरा आणि जीएसटी यामुळेदेखील बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर झोजवाला ताणतणावाखाली असल्याची शक्यता त्यांचे सहव्यावसायिक व्यक्त करत आहेत.झोजवाला यांची मालमत्ता जप्तओपन लॅण्ड टॅक्स न भरल्याने महापालिकेने झोजवाला यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली होती. जप्त मालमत्तेचा लिलाव केला होता. या घटनेचा झोजवाला यांनी धसका घेतला होता. एमसीएचआयच्या पदाधिकाºयांसोबत झोजवाला याविषयी बोलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.ओपन लॅण्ड टॅक्सची थकबाकी न भरल्याने बजावलेल्या नोटिसा व केलेली जप्तीची कारवाई याचा आणि एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येचा संबंध जोडणे योग्य नाही. - विनय कुळकर्णी, करनिर्धारक व संकलक, केडीएमसीबदनामीच्या धसक्याने झोजवाला यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा आमचा कयास आहे. ओपन लॅण्ड टॅक्स कमी झाला. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामध्ये महापालिकेने जप्ती सुरू केल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.- विकास वीरकर, सचिव, एमसीएचआयमंगळवारी सकाळी ९ वाजता पश्चिमेतील बारदान गल्ली येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच बांधकाम व्यावसायिक असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. झोजवाला यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. झोजवाला यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे