शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 01:00 IST

गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत.

स्नेहा पावसकर ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने १२ आॅगस्टपर्यंत आणि त्यानंतरही एसटीची सोय केली आहे. यात ठाण्यातून १२ आॅगस्टपर्यंत कोकणात गेलेल्या प्रत्येक बस या भरून गेली. मात्र, १३ तारखेपासून जाणाºया एसटीला ठाणेकर कोकणवासीयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे नियम पाळून जाणाºया एसटीमध्ये २२ सीट बुक होतात. परंतु, गेल्या चार दिवसांत ठाण्यातून कोकणात गेलेल्या एसटी या जेमतेम ५० टक्के भरल्या होत्या. मूळात आता एसटीने जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट सक्तीची असल्याने चाकरमान्यांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत. ५ ते १२ आॅगस्टदरम्यान कोकणात जाणाºयांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची नव्हती. तर एसटीने जाणाºयांना ई-पासचीही गरज नव्हती. याच पार्श्वभूमीवर राज्य महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे,कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भार्इंदर या पाच डेपोतून ५ ते १२ आॅगस्टदरम्यान ३९७ जादा बस सोडण्यचा निर्णय घेतला होता. त्याला ठाणेकर कोकणवासीयांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. ३९७ पैकी अर्ध्याहून जास्त म्हणजे २१६ बस कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसाठी सोडल्या गेल्या. बसची संख्या कमी करावी लागली असली तरी त्या पूर्ण २२ प्रवाशांनी भरून गेल्या. मात्र, १३ तारखेपासून कोकणात जाणाºया प्रवाशांना कोरोना स्वॅब टेस्ट अनिवार्य केली आहे. ती निगेटिव्ह आली तरच प्रवास करता येणार आहे. त्याचा परिणाम एसटीच्या बुकिंगवर झालेला दिसला. कोरोना टेस्ट करून एसटीने कोकणात जाण्याची ठाणेकरांची मानसिकता दिसत नाही. त्यातच ती करून गेले तरी अनेक ग्रामपंचायतीने गावात प्रवेशासाठीचे नियम वेगवेगळे केले आहे. परिणामी १३ आॅगस्टपासून ठाण्यातून जाणाºया एसटीमध्ये जेमतेम १२-१३ प्रवासी होते. जेमतेम अर्धे प्रवासी असल्याने आम्ही गाडी सोडली. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी असतील तर मात्र आम्हाला तेवढ्याचप्रवाशांसाठी एसटी सोडायची की नाहीविचार करावा लागेल, असेएसटीच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.>गणपतीला कोकणात जायची ओढ आहे, पण कोरोना टेस्टचा खर्च, त्रास नकोसा वाटतो. एवढं करूनही टेस्ट निगेटिव्ह आली तरी पुन्हा गावात तीन दिवस क्वारंटाइन सक्तीचे केले आहे, त्यामुळे अर्धा गणेशोत्सव क्वारंटाइनमध्येच संपेल. त्यामुळे यंदा बाप्पाला इथूनच हात जोडायचे.- ज्ञानेश परब, ठाणे>कोकणात गणेशोत्सवाची मजा असते. दरवर्षी कुटुंबासह जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे इतके वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे जायची इच्छा नाही. प्रवासात आणि गावी पोहोचल्यावरही नियम. एसटीमध्ये सोशल डिस्टन्स चांगले आहे. मात्र, कोरोना टेस्ट आवश्यक आहे. ती निगेटिव्ह आली तर प्रवास, पण पॉझिटिव्ह आली तर प्रवास करताच येणार नाही आणि पैसेही मिळणार नाही, त्यामुळे डबल नुकसानही होणार आहे.- दर्शन सरमळकर, ठाणे