शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील २७ लाखांच्या जेसीबी चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:58 IST

ठाण्यातील घोडबंदर रोड येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. मुरबाड येथून हा जेसीबी हस्तगत करण्यात आला असून सुमित चितारे आणि चंद्रकांत पोटे या दोन्ही आरोपींना पुण्यातील दौंड येथून अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईपुण्यातील दौंड येथून घेतले आरोपींना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाघबीळ येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुमित चितारे (२१, रा. आलेगाव, दौंड, पुणे) आणि चंद्रकांत पोटे (१८, रा. बारीवेल, दौंड, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हा जेसीबीही हस्तगत करण्यात आला आहे.वाघबीळ येथील रहिवाशी अभिमन्यू मढवी यांनी व्यावसायिक कामाच्या वापराचे त्यांचे जेसीबी हे वाहन २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाघबीळ रोडवरील मोकळया जागेत उभे करुन ते घरी गेले होते. ते २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास त्यांच्या कामासाठी जेसीबी उभे केलेल्या ठिकाणी आले. तेंव्हा त्यांच्या जेसीबीची चोरी झाल्याचे आढळले. त्यांनी ठाणे मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांच्या या महागडया वाहनाचा शोध घेतला. ते कुठेही आढळून न आल्याने अखेर याप्रकरणी त्यांनी १ फेब्रुवारी रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाची या प्रकरणासाठी नियुक्ती केली. घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीच्या आधारावर सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस हवालदार एस. बी. खरात, आर. एस. चौधरी आणि पोलीस नाईक आर. एस. महापुरे आदींच्या पथकाने कल्याण, मुरबाड, जुन्नर, पारनेर आदी भागांमध्ये आरोपींचा शोध घेतला. जेसीबीची चोरी करणारे हे पुणे जिल्हयातील दौंड येथील असल्याची खबऱ्यांकडून खात्रीशीर टीप या पथकाला मिळाली. त्यानंतर दौंड तालुक्यातील बोरीवेल आणि आलेगाव येथे सापळा रचून सुमित आणि चंद्रकांत या दोघांनाही २ फेब्रुवारी रोजी अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील हा २७ लाखांचा जेसीबी हस्तगत केला. त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांचा तिसरा साथीदार बाळासाहेब पोटे याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली..............................चोरीनंतर जेसीबी नेला मुरबाडकडेजेसीबीची चोरी केल्यानंतर सुमित चितारे आणि चंद्रकांत या दोघांनी कल्याण- मुरबाड मार्गे हा जेसीबी नेला. तिथे रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या एका मोकळया जागेमध्ये हा जेसीबी उभा करुन ते दौंडमध्ये पसार झाले होते. त्यांच्या मागावर असलेल्या कासारवडवली पोलिसांनी हा जेसीबी आणि तो चोरणाºया दोघांना दौंड येथून अटक केली आहे. जेसीबीच्या मागोमाग मोटारसायकलीवरुन टेहळणी करीत जाणारा बाळासाहेब पोटे हा मात्र पसार झाला आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी