जवाहरबाग स्मशानभुमी होणार अत्याधुनिक, महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:13 PM2019-01-17T17:13:22+5:302019-01-17T17:15:49+5:30

येत्या २६ जानेवारी पासून ठाण्यात जवाहरबाग स्मशानभुमी अत्याधुनिक स्वरुपात ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्मशानभुमीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.

Jawaharbaba will be the ultra modern, state-of-the-art municipal commissioner | जवाहरबाग स्मशानभुमी होणार अत्याधुनिक, महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

जवाहरबाग स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल. सोबत अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर व इतर अधिकारी.

Next
ठळक मुद्देविद्युत व्यवस्था सुरु करण्याचे दिले आदेशयेथील रस्त्याचेही रुंदीकरण करण्याच्या सुचना


ठाणे - जवाहरबाग येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक स्मशानभूमीच्या कामाची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल गुरुवारी पाहणी केली. स्मशानभूमीशी निगडीत कामे युद्ध पातळीवर करण्याचे आदेश देतानाच येत्या २६ जानवारी रोजी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान राघोबा शंकर रोडवरील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्याचे बांधकाम करणे व त्यामध्ये बाधित होणाºया २७ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
                  ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीतंर्गत जवाहरबाग येथील जुन्या स्मशान भूमीच्याबाजूला नवीन अत्याधुनिक स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध वास्तुविशारद प्रविण जाधव आणि महापालिका यांनी संयुक्तपणे या स्मशानभूमीचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे, नगर अभियंता राजन खांडपेकर, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर उपस्थित होते. या स्मशानभूमीची मुलभूत कामे पूर्ण झाली असून स्मशानभूमी समोरील चौकाचे सुशोभिकरण करणे, चौकामधील आजुबाजूच्या माहापालिकेच्या इमारतींची रंगसंगती स्मशानभूमीच्या रंगसंगतीशी सुसंगत करणे, राघोबा शंकर रोडवरील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्याचे बांधकाम करणे व त्यामध्ये जी २७ कुटुंबे बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे, स्मशानसोरील फुटपाथची दुरूस्ती करणे, स्शानभूमीजवळील शौचालयाची रंगरंगोटी करणे तसेच महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता राजन खांडपेकर यांना दिल्या. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या चौकामध्ये हाय मास्ट बसविण्याच्या व स्मशानभूमीच्या गेटसमोरील विद्युत पोल हलविण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या. त्याचबरोबर आरोग्य विभागाने या ठिकाणी आवश्यक तेवढ्या गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
यावेळी आयुक्तांनी स्मशानभूमीच्या आवारात आकर्षक लँडस्केपिंग करणे, आवारात विद्युत व्यवस्था करणे, ध्वनिक्षेपन यंत्रणा लावणे तसेच स्मशानभूमीच्या आवारात माहितीचे फलक लावण्याच्या सूचना संबंधित काम करणाºयाा विकासकाला दिल्या.



 

Web Title: Jawaharbaba will be the ultra modern, state-of-the-art municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.