शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:45 IST

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा

- अनिकेत घमंडी डोंबिवली: आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय. आमच्या मातापित्यांना बाहेर हुसकावण्यात आले, हे दु:ख अव्यक्तच आहे. आता मात्र आम्ही स्वाभिमानाने आमच्या घरी, नंदनवनात जाऊ शकतो, यापेक्षा स्वर्गीय आनंद काय असेल, असे भावपूर्ण उद्गार काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबई या संस्थेचे सचिव सुनील रंजन कौल यांनी ‘लोकमत’कडे काढले.काश्मीरचे कलम ३७० हटवून आम्हाला केंद्र सरकारने मोठा अनमोल ठेवा दिला असल्याचे खारघर येथे कुटुंबीयांसमवेत वास्तव्याला सुनील रंजन कौल यांनी सांगितले. मुंबईसह देशभरात अन्यत्र कार्पेट, सतरंज्या विकणारे काही उपद्रवी काश्मीरमध्ये बंदुका हातात घेतात. तिथल्या गोरगरिबांवर, मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करतात. त्यांना या निर्णयामुळे मोठी चपराक बसली आहे. सरकारच्या वाटचालीकडे आता काश्मिरींचे लक्ष लागल्याचे कौल म्हणाले.कौल म्हणाले की, अनेक वर्षांनी आम्हाला मोकळे वाटतेय. मनामध्ये एकीकडे खूप आनंद तर दुसरीकडे जन्मभूमीकडे जाण्याची ओढ आहे. आनंदामुळे खरेतर शब्द फुटत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत २० हजारांहून अधिक संख्येने राहणाऱ्या काश्मीरच्या नागरिकांची सध्या हीच अवस्था आहे. ३७० कलम हटणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारच्या या निर्णयामुळे तो सोनियाचा दिन आलाच. ज्या सरकारमध्ये हिम्मत असते, तेच असा निर्णय घेऊ शकतात. आता भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच देशातील कोणताही बांधव काश्मीरमध्ये येऊ शकतो. त्याला कोणतेही दडपण, भीती बाळगण्याची गरज नाही. तिथे येऊन सृष्टीसौंदर्याची मजा लुटा, भारताचे नंदनवन काय असते, हे प्रत्येकाने अनुभवावे. राज्य सरकारची सक्ती, मनमानी आणि दबावतंत्र नष्ट होईल. पण, खºया अर्थाने यापुढे केंद्र सरकारची जबाबदारी मोठी आहे. यानंतर येथून तिकडे जाणाºया मूळ काश्मिरी नागरिकांची सुरक्षा, त्यांना रोजगाराची हमी केंद्राला द्यावी लागेल.आगामी काळात तेथे कंपन्या कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, त्या जोरावर तेथील मूळ काश्मीरचा रहिवासी तेथे जायला तयार होईल. ज्या सुखसुविधा त्यांना महाराष्ट्रात तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मिळतात, तशाच सुखसुविधा काश्मिरात मिळाल्या, तर निश्चितच कुटुंबासह सगळे तेथे जाणार, असे कौल म्हणाले.सुनील कौल यांचे आईवडील हे श्रीनगर येथील लालचौक, करणनगर येथे वास्तव्याला होते. गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल १९९० मध्ये त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतच वास्तव्य केले. कौल यांचे आईवडील हयात असून त्या दोघांनाही केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाला आहे, असे कौल यांनी सांगितले.‘रोजगाराचा प्रश्न सुटला तर युवक जातील’ : मूळचे श्रीनगर येथील अजय धर १९८५ नंतर अगोदर मुंबईत व आता ठाण्यात वास्तव्य करतात. काश्मीरमधील सरकारी खात्यात नोकरी करताना आलेला दबाव, मनमानीला कंटाळून मुंबईत आले. महाराष्ट्रात बंधुभाव अनुभवायला मिळाला, असे आवर्जून नमूद करणारे धर म्हणतात की, आता येथील नागरिकांनीही काश्मीरला यावे, तिथली संस्कृती बघावी, तिथले वेगळेपण अनुभवावे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.मात्र, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्यावरच कुटुंबांतील युवकांना तेथे जायला आवडेल. आता केवळ ३७० कलम हटवण्याचा निर्णय झाला असून सगळे सुटसुटीत व्हायला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली व्हायला काहीसा वेळ जाईल. त्यानंतर, पुन्हा काश्मीरला जायचे आणि वास्तव्य करायचे याहून वेगळा आनंद, सुख काय असेल?

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर