शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात दहा हेक्टरमध्ये उभारणार ‘जांभूळ वन’, वन विभागाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:33 IST

बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात पाठविले होते.

बदलापूर : बदलापुरातील जांभळाची गोडी हे सर्वज्ञात असतानाच आता या जांभळाला सर्वोत्कृष्ट जांभळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या अहवालानुसार बदलापूरच्या जांभळात अँथोसायनीन आणि ॲन्टिऑक्सिडंट आढळून आले आहेत. त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानले जात आहे. बदलापुरात जांभळाची गोडी वाढावी यासाठी आता वन विभागानेही जांभूळ वन उभारण्यासाठी दहा हेक्टर जागेची मागणी करणारा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे केला आहे.बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात पाठविले होते. केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागात या जांभळाच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यात गरवी प्रकरातील जांभूळ मांजर्ली, वालिवली, बोराडपाडा आणि कोंडेश्वर परिसरातून संकलित केले होते. या जांभळाच्या भौतिक, जैव रसायन आणि ॲन्टिऑक्सिडंट अशा तीन पातळ्यांवर त्याची तपासणी केली होती. शहरातील कमी होत चाललेल्या या बदलापूरच्या जांभळाला जुने स्थान मिळवून देण्यासाठी जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राची मदत घेतली जात आहे. बदलापूर आणि आसपासच्या भागात एक हजार २५० झाडे आहेत. पर्यावरणप्रेमींनी सुमारे दोन हजार रोपे तयार केली असून लागवडीसाठी तयारी सुरू आहे. 

जांभळाची बाजारपेठ तयार करण्याचे प्रयत्नबदलापूर शहर आणि ग्रामीण भागात जांभळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन बदलापूरला जांभळाची बाजारपेठ तयार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तसेच जांभळाचा बदलापूर ब्रँड तयार करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.‘जांभूळ वन’ उभारण्याचे प्रयत्नजांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली बदलापुरात दहा हेक्टर जागेवर जांभूळ वन उभारण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागामार्फत जागेचा शोध सुरू आहे. 

बदलापूरच्या जांभळामध्ये ‘अँथोसायनीन’चे प्रमाण अधिक आहे. यामुळे जांभळाचा रंग अधिक गडद असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. सोबतच या जांभळाच्या प्रजातींमध्ये ॲन्टिऑक्सिडंटही असल्याचे नमूद केले आहे.- आदित्य गोळे, अध्यक्ष, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट

टॅग्स :badlapurबदलापूर