शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांसाठी जांभीळघर बनणार ‘अंड्यांचे गाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 02:02 IST

ग्रामीण जनता व तेथील सक्रिय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : ग्रामीण जनता व तेथील सक्रिय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यानुसार, जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ‘एक गाव अंड्यांचे’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम अंबरनाथ तालुक्यातील जांभीळघर येथे राबवण्यात येत आहे. येथील २८ गावकऱ्यांना ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्या दिल्या जात आहेत. त्यापासून मिळणाºया अंड्यांच्या १५ प्रकारच्या रेसिपींद्वारे बचत गटांनादेखील त्यातून रोजगार देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी नियोजन केले आहे.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणात ‘एक गाव अंड्यांचे’ या उपक्रमासाठी जांभीळघर या गावाची निवड झाली आहे. ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्यांची खरेदी झाली आहे. प्रत्येकास सुमारे ५० ‘तलंगा’ म्हणजे प्रथमच अंडी देणाºया कोंबड्यांचे वाटप या आॅक्टोबरअखेर होणार आहे.यासाठी सुमारे चार महिन्यांच्या या कोंबड्यांची (तलंगा) खरेदी झाली आहे. या कोंबड्या सतत ७२ आठवडे म्हणजे दीड वर्षे अंडी देणार आहेत. या दृष्टीने त्यांची काळजी घेण्यात आली आहे.रोगापासून बचाव करण्यासाठी या चार महिन्यांच्या कोंबड्यांना मानमोडी, देवी आदी रोगांपासून बचाव करणारे लसीकरणदेखील पूर्ण झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण पवार यांनी लोकमतला सांगितले.१४०० कोंबड्यांचे वाटप करणारजांभीळघरच्या या सर्व २८ लाभार्थ्यांकडे तब्बल एक हजार ४०० ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्या उपलब्ध होणार आहेत. यापासून मिळणाºया अंड्यांच्या विक्रीसाठी मार्केटचे महत्त्वपूर्ण कामदेखील जिल्हा परिषदेने केले आहे. महिला व बालविकास विभाग सहा रुपये दराने या अंड्यांची खरेदी करणार आहे.यामुळे लाभार्थ्यांना बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली आहे. अंड्यांच्या या होलसेल विक्रीनंतरही शिल्लक राहणाºया अंड्यांची सामान्य ग्राहकांना विक्री व्हावी, यासाठी अंबरनाथ येथील रस्तेच्या कडेला एक मोठे विक्री केंद्र उभारले जात आहे. याशिवाय, या गावातील व परिसरातील महिला बचत गटांना अंड्यांपासून तयार होणाºया विविध खाद्यपदार्थांच्या सुमारे १५ रेसिपींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या गावठी अंड्यांच्या १५ रेसिपी खवय्यांसाठी महिला बचत गटांकडून उपलब्ध होणार आहे. खवय्यांच्या पसंतीच्या या पदार्थांना तयार करण्यासाठी लागणारे विविध स्वरूपांचे भांडे, पोशाख, विक्री केंद्रासाठी लागणारी टपरी जिल्हा ग्रामीण विकास विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.बचत गटांना प्रशिक्षणया सर्व लाभार्थ्यांसह महिला बचत गटांना खास प्रशिक्षण जांभीळघर येथील समाजमंदिरमध्ये नुकतेच पार पडले. यावेळी मुंबईच्या गोरेगाव येथील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी विविध स्वरूपांचे धडे या कार्यशाळेत दिले. या लाभार्थ्यांकडे कोंबड्या पाळण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचीदेखील प्रत्यक्ष पाहणीही झाली आहे. या लाभार्थ्यांसाठी लागणाºया या कोंबड्या १३ आॅक्टोबरला चार महिन्यांच्या होत आहेत.लाभार्थ्यांस ७५,५०० रुपयांचे अनुदानया कोंबड्या अल्पावधीतच अंडी घालणार असल्याचे डॉ. पवार यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या कावेरी जातीच्या कोंबड्या गावठी आहेत. त्या खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठीप्रत्येकास ७५ हजार ५०० रुपये खर्च येत आहे. यातील ७१ हजार ७२५ रुपये लाभार्थ्यास अनुदान म्हणून डीबीटीद्वारे दिले जात आहे. तर, उर्वरित पाच टक्के हिस्सा म्हणजे तीन हजार ७७५ रुपये लाभार्थ्यांस स्वत: भरावे लागत आहेत.

टॅग्स :thaneठाणे