शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन मेगाब्लॉक घेणार; पाचव्या-सहाव्या मार्गावरून महिन्याभरात वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 07:06 IST

कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.  रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिनाभरात पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून लोकलसेवा सुरू होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिली. रविवारच्या कामानंतर फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन वेळा मेगाब्लॉक घेऊन ही सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.  रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले. त्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. खासदार शिंदे यांच्याकडून या  कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी पाचवी आणि सहावी मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वापरात येईल, अशी माहिती दिली. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एकदा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. एकूण तीन मेगाब्लॉक सहा फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. 

क्रॉसिंगचा प्रश्न सुटेलया कामामुळे लोकल त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असतील. त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल. या दोन मार्गामुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढण्याची आशा आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल असे शिंदे यांनी सांगितले.

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्याnअमरावती-मुंबई, नागपूर-मुंबई सेवाग्राम, नांदेड-मुंबई राज्यराणी, मुंबई-पुणे- मुंबई डेक्कन, मुंबई-जालना -मुंबई जनशताब्दी, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम, मुंबई-गदग या १ ते ३ जानेवारीदरम्यान लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एक्सप्रेस मेगा ब्लॉकच्या कामासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

९.५ किमीचीआहे रेल्वे मार्गिका nकळवा - दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचा हा प्रकल्प ९.५ किमीचा असून, यातील खाडीवरील पूल ४.५ किमी लांबीचा आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या खाडीवरील पुलावरील रेल्वे मार्गिकांची प्रत्यक्ष चाचणी सोमवारपासून घेण्यात येणार असल्याने जुन्या पुलावरील धिम्या गतीच्या रेल्वे गाड्या नवीन पुलावरून धावतील, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. nउपनगरीय रेल्वे गाड्या साधारणपणे १०५ किमी प्रति तास वेगाने धावत असतात. परंतु आता या चाचणीदरम्यान लोकल सुरुवातीला ३० किमी प्रति तास या गतीने धावतील. नंतर ही गती वाढवत सुमारे ५० किमी प्रति तास, नंतर ७० किमी प्रति तास एवढी गती राखत अंतिम चाचणी काळात पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०५ किमी प्रति तास वेगाने धावतील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.