शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

शिक्षक ते शिक्षणाधिकारी... शिक्षकांमुळेच घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 1:29 AM

नोकरी आणि संसार सांभाळत संगीता भागवतांनी मिळवले स्पर्धा परीक्षांमध्ये यश

ठाणे : माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबातला. वडील शिक्षक होते. पण, तेव्हा आम्हाला स्वत:चे करिअर निवडण्याची मुभा नव्हती. दहावीनंतर लग्न झालं. लग्नानंतर वडीलधाऱ्यांनी डीएडच्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन दिला आणि पुढे वडिलांचा वारसा जपत शिक्षक होण्याचे ठरवले. शिक्षक तर झाले, पण यातून पुढे आणखी कोणकोणत्या पदांवर काम करता येते, याची कल्पना नव्हती. त्यावेळी जीवन पवार आणि खोतसर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला. नोकरी आणि संसार सांभाळून परीक्षा देत राहिले आणि आज शिक्षणाधिकारीपदी पोहोचले, याचे श्रेय शिक्षकांनाच, अशा शब्दांत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी ऋण व्यक्त केले.दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल, पाटण, सातारा येथे झाले. वडील जवळच्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरात अभ्यासाचे आणि शिस्तीचे वातावरण होते. दहावीनंतर मला पुढे शिकण्याची इच्छा होती. कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, हे ठरवलेलं नव्हतं. मात्र, शिकायचं होतं. पण लग्नानंतर डीएडला प्रवेश झाला. त्या काळात मुलींनी सहसा डीएड, बीएड करावे, असाच आग्रह असायचा. कमला नेहरू अध्यापक विद्यालय, कराड, सातारा येथे डीएड पूर्ण केले. तेथील शिक्षकांनी आम्हाला चांगले शिक्षक होण्यासाठी शिकवण देतानाच एक चांगली व्यक्ती म्हणूनही घडवले. त्यांची शिकवण ही आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी आहे.स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे...डीएड झाल्यावर मला १९९१ साली शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. माझ्यातील अभ्यासूवृत्ती आणि मेहनत करण्याची तयारी पाहून मला जीवन पवार आणि खोतसरांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे सुचवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी २००१ ते २०१३ सलग १३ वर्षे विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा देत राहिले आणि यश मिळवले. पण, हेच मार्गदर्शन जर मला वेळीच मिळाले असते, तर वर्षे वाया गेली नसती.त्या १३ वर्षांत मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था क्लास-२, गटशिक्षणाधिकारी क्लास-२, तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि जिल्हा शिक्षणाधिकारी अशा चार पदांसाठी परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तीर्ण झाले. पण, घरातील वडिलांचा शिक्षकीचा वारसा सांभाळण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणातच रमण्याचे ठरवले आणि शिक्षणाधिकारीपदी रुजू झाले. माझ्या वडिलांकडून आलेला हा शिक्षकपदाचा वारसा माझ्या पुढच्या पिढीनेही जोपासला आहे. माझा मुलगा स्वप्नील हासुद्धा शिक्षक आहे.डीएड कोर्सदरम्यान वसतिगृहात कुटुंबीयांना भेटायलाही होती बंदी...लग्नानंतर डीएडचा कोर्स केला. त्यासाठी हॉस्टेलला राहावे लागत असे. त्यावेळी अभ्यास आणि मुलींची सुरक्षितता लक्षात घेत १५ दिवसांतून एकदा घरी जाण्याची परवानगी दिली जायची. मात्र, त्यादरम्यान जर कुटुंबातील कोणी व्यक्ती भेटायला हॉस्टेलला आली, तर त्यांची भेटही घडवली जात नव्हती. अनेकदा माझ्या कुटुंबातील माणसे येऊन न भेटताच परत जायची. तेव्हा खूप वाईट वाटायचे, पण ती गजेंद्र आईनापुरेसरांची कडक शिस्त होती. कोणालाही त्यात सवलत मिळत नसे.शिक्षकांनी चांगलं माणूस म्हणूनही घडवलं...

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षकambernathअंबरनाथthaneठाणे