शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतने रक्ताचे नाते जपले हे कौतुकास्पद: रवी जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 01:00 IST

दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवाशी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा निर्माते रवी जाधव यांनी केले.

ठळक मुद्देहिरानंदानी मेडोजमध्ये ४६ दात्यांचे रक्तदानपोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवाशी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा निर्माते रवी जाधव यांनी केले. रविवारी सकाळी हिरानंदानी मेडोज याठिकाणी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मनोगत व्यक्त करतांना ते बोलत बोलत होते. यावेळी ४६ दात्यांनी रक्तदान केले.ठाण्यातील हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस येथे हिरानंदानी मेडोज फेडरेशन, ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे आणि इंडियन रेड क्र ॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत रक्ताचं नात या उपक्र मांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चित्रपट दिग्दर्शक जाधव पुढे म्हणाले, लोकमतने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल खूप आनंद होत आहे. सध्या कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात राज्यभर रक्ताचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे अशा रक्तदान शिबिराची काळाची गरज आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी लोकमतने रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. महाराष्टÑभर जवळपास ५०० ठिकाणी अशा ठिकाणी रक्तदान शिबिराचे लोकमतने आयोजन केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराला आणखी प्रतिसाद मिळेल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी ठाण्याचे भाजप ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, हिरानंदानी मेडोज फेडरेशनचे अध्यक्ष जयदीप ठक्कर, भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, ठाणे जिल्हा भाजप युवक अध्यक्ष सारंग मेढेकर आणि लोकमतचे उपाध्यक्ष अनिरु द्ध हजारे आदी उपस्थित होते.रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान या महारक्तदान शिबिर सोशल डिस्टनिसंगच्या नियमांचे पालन करुन तसेच शासनाने दिलेल्या सर्व नियमानुसार करण्यात आले. शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि नगरसेविका स्रेहा आंब्रे यांच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरासाठी राजेश सावंत, समीर पॉल, समीर माने, रतन पवार, शुभम त्रिपाठी, पुष्कर लखे, सहील कदम, सागर पवार, अनुष्का शिंदे, सानिका गोडबोले, निमित ललन आणि नीरज मालवी आदींचे सहकार्य लाभले.या दात्यांनी केले रक्तदान...या शिबिरामध्ये लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे, नितीन खरे आणि सौरभ वैद्य यांच्यासह हिरानंदानी मेडोज सोसायटीतील अर्चना संद, जितेंद्र पाटील, पियुश गुदलिशा, गुलाब चव्हाण, देवाशिष शहा, धवल मारु, हार्दिक सुमारिया, निलेश विरपंजा, सचिन कांबळे, सुरेश सोळंखे, मिरज सावला, अजय मिर्झा, प्रदीप पाल, प्रदीप पांडे, सुनिल चंद्रन, अमोल जोशी, रोमित नागडा, चिराग बोहरा, सलीम शेख, अनिरुद्ध चव्हाण, रमेश गुप्ता, नितीन बनसोडे, मनिष खालंकारे, अशोक नादमोरी, राकेश खमके, राकेश बोºहाडे, रोहित बोºहाडे, अभिषेक गोरे, अक्षय पापडे, सपना विश्वकर्मा आणि जया अय्यर आदी ४६ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.

 

टॅग्स :thaneठाणेBlood Bankरक्तपेढीMaharashtraमहाराष्ट्र