शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमधील वीजग्राहकांप्रश्नी राज्यपालांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:29 IST

वाढीव बिलाने ग्राहक त्रस्त : सरकारने योग्य निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वीजग्राहक वाढीव वीजबिलाने मेटाकुटीस आले असून सरकारने सुरुवातीला जाहीर केलेली १०० युनिटमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. या समस्येवर सरकारने योग्य निर्णय घेऊन वीजग्राहकांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी व आमदार महेश चौघुले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.

राजभवन येथे गेलेल्या शिष्टमंडळात भाजप गटनेते हनुमान चौधरी, सभागृह नेते श्याम अग्रवाल, नगरसेवक यशवंत टावरे, भाजप शहर सरचिटणीस प्रेमनारायण राय, विशाल पाठारे, कोषाध्यक्ष हसमुख पटेल, दक्षिण भारतीय आघाडी कोकण विभाग संयोजक मल्लेशम कोंका आदी उपस्थित होते. शेट्टी व चौघुले यांनी भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देत ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात वाढीव वीजबिल देण्यात आले. याबाबत कोणताही दिलासा राज्य सरकारने दिला नसून १०० युनिटपर्यंत वीजबिलमाफीची घोषणा करून ती पूर्ण न करण्याने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 

लॉकडाऊनकाळात शहरातील असंख्य परप्रांतीय कामगार कुटुंबासह गावाला  गेले असतानाही वाढीव वीजबिल देऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर, टोरंट पॉवर कंपनीकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित केला जात आहे. शहरातील यंत्रमागधारकांसह ग्राहकांवर वीजबिलवसुलीसाठी जबरदस्ती न करता बिल भरण्यासाठी मुदत द्यावी, जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल. राज्यपालांनी सरकारला  निर्देश देऊन भिवंडीतील ग्राहकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. राज्यपालांनी यावर सकारात्मक चर्चा करून लवकरच बैठक घेण्याबाबत निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी