शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना घडणार इस्रोची सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:30 IST

सुभेदारवाडा विद्यालयाचे विद्यार्थी; १४० प्रकल्पांचे सादरीकरण

जान्हवी मोर्येडोंबिवली : हायड्रोम पंप तयार केलेल्या कल्याणच्या सुभेदारवाडा विद्यालयाचे विद्यार्थी विज्ञान संमेलनात अव्वल ठरले आहेत. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रकल्पातील पहिल्या दहामध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोत जाण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानतर्फे संचालित यमगरवाडी येथील एकलव्य विद्यासंकुलाच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. इस्रोच्या सफरीचे दर्शन घडणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

डोंबिवतीलतील स. वा. जोशी विद्यालयात आयोजित या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उरण येथील १४० प्रकल्प मांडण्यातआले होते. प्रकल्पातील नावीन्यता, कल्पकता, प्रत्यक्षात आणण्यासारखे किती प्रकल्प होते. त्यांच्यासाठी किती खर्च झाला, ते समाजोपयोगी आहेत का, गुगलवर सर्च करून प्रकल्प केला आहे का, या निकषांवर प्रकल्प निवडण्यात आल्याचे परीक्षकांकडून सांगण्यात आले. या प्रदर्शनात मांडलेले ११९ प्रकल्प गुगलच्या मदतीशिवाय बनवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.सुभेदारवाडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हायड्रोम पंपाचा प्रकल्प सादर केला होता. या पंपाच्या साहाय्याने विजेशिवाय नॉनरिटेनिंग व्हॉल्व्हचा वापर करून पाणी उंचावर नेता येते. पाण्याची दिशा बदलून दुसºया दिशेने पाणी एअर चेंबरमध्ये जाते. व्हॉल्व्हमुळे वर गेलेले पाणी खाली येते. त्याउलट, व्हॉल्व्ह लावलेल्या ठिकाणी एअर चेंबर्समध्ये हवा संकुचित होते आणि पाणी वर ढकलले जाते. या प्रकल्पाचा वापर नदीजोड प्रकल्पासाठी केला जाऊ शकतो. कोयना धरणाने धरणाचे समुद्राला मिळणारे पाणी अडवून पुन्हा नदीत सोडण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे थांबवली जाऊ शकते, असे प्रकल्पप्रमुख साक्षी रानडे आणि ऊर्जिता चौधरी यांनी सांगितले.

दुसरा क्रमांक ठाण्याच्या डॉ. बेडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. त्यांनी अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक हा प्रकल्प सादरकेला होता. तृतीय क्रमांक जीईआय ब्लॉसम इंटरनॅशनल विद्यालयाने मिळवलेला आहे. त्यांनी एनर्जी बार प्रकल्प सादर केला होता.चौथ्या क्रमांकावर डोंबिवलीचे स्वामी विवेकानंद विद्यालय त्यांनी मॉस्क्युटिव्ह टॅप हा प्रकल्प सादर केला होता. पाचव्या क्रमांकावर एनईएस इंग्लिश स्कूल असून त्यांनी आयडियल गार्डन प्रकल्प सादर केला होता. या सर्व विद्यार्थ्यांना आता इस्रोला जाण्याची संधी मिळणार आहे.‘एसआए’ला उत्तेजनार्थच्उत्तेजनार्थ पारितोषिक एसआयए हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजला दिले असून त्यांनी हायड्रोपोनिक्स प्रकल्प सादर केला होता. ओमकार सीबीएसई स्कूलने सेफ अ‍ॅण्ड सेक्युअर सिटी हा प्रकल्प सादर केला होता. ओमकार आयसीएसई स्कूलने रोबोटिक फार्मिंग प्रकल्प सादर केला होता. एकलव्य प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलने नायट्रोजनाइज्ड सनकॅचर हा प्रकल्प सादर केला होता.

टॅग्स :isroइस्रोdombivaliडोंबिवली