शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पत्रीपुलावर लावलेला लोखंडी बार पडला, विरोधी पक्ष नेता उचलण्यास धावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 18:33 IST

येथील जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवजड वाहने वाहतूक करताना दिसून येत आहे. त्यामुळे या पुलावरील एका दिशेला लोखंडी बार आडवा टाकण्यात आला होता. या लोखंडी बारला एका मालवाहतूक गाडीने जोराची धडक दिल्याने हा बार खाली पडला.

कल्याण- येथील जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवजड वाहने वाहतूक करताना दिसून येत आहे. त्यामुळे या पुलावरील एका दिशेला लोखंडी बार आडवा टाकण्यात आला होता. या लोखंडी बारला एका मालवाहतूक गाडीने जोराची धडक दिल्याने हा बार खाली पडला. सध्या हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला आहे. त्यामुळे, जर एखादे हलके वाहन वाहतूक करत असते तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेचा ढिसाळपणा उघड झाला आहे.    कल्याण शीळ रस्त्यावरील रेल्वे मार्गावर जुना पत्री पूल आहे. हा पूल धोकादायक असल्याने अवजड वाहतुकीसाठी तो बंद करण्यात यावा, असे मध्य रेल्वेने महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळास कळविले होते. तसेच वाहतूक पोलिसांनीही याबाबत कळविण्यात आले होते. कल्याण पत्री पूलावरुन अवजड वाहनांसाठी पहाटे सहा ते रात्री दहा या वेळेत वाहतूक बंदी असताना त्यावरुन सर्रासपणे वाहतूक केली जात होती. वाहतूक पोलीस नसल्यावर अवजड वाहने डोळा चुकवून जुन्या पत्रीपूलावरुनच मार्गक्रमण करीत असल्याच्या तक्रारी वारंवार वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी नेतीवलीच्या दिशेने कल्याण स्टेशनकडे येताना अवजड वाहनांकरीता अडथळा तयार करण्यासाठी भला मोठा लोखंडी बार टाकला होता. हा बार दोन वेळा पडला. त्यानंतर आज पुन्हा दुपारी 2 वाजता हा बार खाली पडला. लाकडाने भरलेल्या जड वाहनाने या बारला धडक दिल्याने हा बार पडला. जुन्या पत्री पुलावरुन अवजड वाहनांसाठी बंदी असली तरी हलक्या वाहनांना येथून प्रवेश दिला आहे. त्यामुळे, बार पडला तरीही हलकी वाहने मार्गक्रमण करीत होती. अर्धवट अवस्थेत पडलेला बार दूर हटविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे पाहून त्याठिकाणाहून महापालिकेच्या दिशेने येत असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी बार कोणाच्या अंगावर, वाहनावर पडू नये यासाठी तो दूर हटविण्याकरीता वाहतूक पोलीस, वार्डन व नागरिकांच्या मदतीने दूर केला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका