शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इराणी सोनसाखळी चोरटा कोल्हापूरातून अटकेत: ठाणे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:48 IST

वेगवेगळया प्रकारे ठाण्यासह राज्यभर फसवणूकीचा तसेच सोनसाखळी चोरीचा प्रकार करीत लुटमार करणा-या इराणी हैदरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये केली अटकअटक टाळण्यासाठी पोलिसांवरही केला हल्लाठाणे, कोल्हापूरसह राज्यभर १९ गुन्हयांची नोंद

ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणा-या हैदर सरताज इराणी (३९, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळे, जि. कोल्हापूर) याला थेट कोल्हापुरातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्याला ११ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे १९ गुन्हे दाखल आहेत.मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि ठाणे ग्रामीण आदी परिसरात हैदर आणि त्याच्या साथीदारांनी अनेक महिलांचे मंगळसूत्र हिसकावले आहेत. हा अट्टल सोनसाखळी चोरटा कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. त्या आधारे रणावरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार आणि शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने ५ मे रोजी त्याला जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले. जानेवारी २०१८ मध्ये ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील सुगंधा दळवी (६२) या महिलेची हैदरसह तिघांनी फसवणूक केली होती. ‘एका मारवाडी शेठला मुलगा झाला आहे, आशिर्वाद द्यायला चला,’ असे सांगून तिच्याकडून अडीच लाखांचे सुमारे नऊ तोळे सोन्यांचे दागिने हिसकावून पलायन केले होते. या गुन्ह्याचीही त्याने कबूली दिली आहे. सोनसाखळी हिसकावून पलायन करणे, पैसे मोजून देतो, अशी बतावणी करून लुटणे तसेच ज्येष्ठ महिलांकडून दागिने लुबाडणे असे वेगवेगळ्या प्रकारचे ठाण्यासह राज्यभर १९ गुन्हे केल्याची माहितीही तपासात उघड झाल्याचे रणावरे यांनी सांगितले. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करून त्याने निसटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ठाणे पोलिसांनी शिताफीने त्याला अखेर अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस