शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

‘मकोका’ रद्द करण्यासाठी इक्बाल कासकरची याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:19 IST

आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सुनावणी झाली.

ठाणे : आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सुनावणी झाली.व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याने कासकरवर ठाण्यात तीन गुन्हे आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ खालीही गुन्हा दाखल आहे. कासकरने ही कठोर कलमे लागू करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला विशेष मकोका न्यायालयात आव्हान दिले आहे. अ‍ॅड. श्याम केसवानी यांनी त्याच्या वतीने युक्तिवाद केला. मकोकातील तरतुदी या गुन्ह्यात लागू होत नाहीत. संघटित अथवा टोळी पद्धतीने गुन्हेगारी केली असली, तरच मकोका लागू केला जातो. तो लागू करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या मंजुरी आदेशात ठोस कारणे नाहीत, असे ते म्हणाले.कासारवडवलीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी १८ सप्टेंबर २०१७ रोजी कासकर, इसरार सय्यद, पंकज गंगर, मुमताज शेख यांना अटक केली होती. त्यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट बळकावले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात छोटा शकीललाही आरोपी केले आहे. मात्र, शकील, कासकरचे संबंध पोलीस सिद्ध करू शकली नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. केसवानी यांनी केला. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी ११ मे रोजी निश्चित केली आहे.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकर