शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : सट्ट्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलालला ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:46 IST

मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे.

ठाणे : आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर स्पर्धांवर जगभरातून सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, मालाड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे.आयपीएलवर डोंबिवलीत सट्टा खेळला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे रामनगर परिसरातून १६ मे रोजी शर्मा यांच्या पथकाने गौतम सावला (५५), निखिल (२५, रा. दोघेही डोंबिवली) आणि नितीश पुंजानी (५५, रा. ठाणे) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेली सामग्रीही जप्त केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल रामा भिया (४०, मालाड) आणि बिट्टू व्रजेश जोशी (२७, मुलुंड) या दोघांना मुंबईतून अलीकडेच ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.सोनू जलाल याचीही माहिती मिळाल्यानंतर त्याला २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शर्मा यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, उपनिरीक्षक रोशन देवरे आदींच्या पथकाने मुंबईतून अटक केली. त्याच्यावर मालाड (२००८), ओशिवरा (२०११), समाजसेवा शाखा (२०११), तर २०१५ मध्ये दिल्ली आणि अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. कासारवडवली आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018IPLआयपीएलCricketक्रिकेटCrimeगुन्हाCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी