शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

तपास पथक केरळमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:36 AM

बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचा चमू केरळ येथे पोहोचला आहे.

ठाणे : बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचा चमू केरळ येथे पोहोचला आहे. या प्रकरणाशी संबंधित काही आरोपी केरळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली.बनावट सीडीसी उमेदवारांना ५० हजार ते लाख रुपयांत विकणाºया अब्दुला मनत्तुमपाडत हकीम, विजयन गोपाल पिल्ले आणि अलीम मोहद्दीन मुसा यांच्यासह सूत्रधार प्रदीप ऊर्फ दिनेश शंकर रौधळ याला पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. आरोपींकडून पोलिसांनी ३७ बनावट सीडीसी आणि २६ वैध पासपोर्ट जप्त केले होते.आरोपींकडून जप्त केलेले बहुतांश पासपोर्ट केरळमधील रहिवाशांचे आहेत. ते पासपोर्टधारक बनावट सीडीसीसाठी आरोपींच्या संपर्कात होते की, आरोपींचे हस्तक म्हणून कार्यरत होते, याचा तपास करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चा चमू केरळमध्ये दाखल झाला आहे. सर्व संशयितांचा तपशील पोलिसांनी मिळवला असून, जबाब नोंदविण्याचे काम हा चमू करत आहे. या जबाबातून संशयितांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करायची की नाही, हे ठरवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>पाकिस्तानी शिक्केआरोपींकडून जप्त केलेल्या बनावट सीडीसींपैकी एका सीडीसीवर पाकिस्तानी शिक्के आढळल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांना विचारणा केली असता, एका सीडीसीच्या कव्हरवर पाकिस्तानी शिक्का आढळल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी शिक्का असलेले ते केवळ कव्हर होते. त्यामध्ये कोणतेही प्रमाणपत्र नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.