मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन खासगी कंपन्यांच्या आजी-माजी संचालकांची चौकशी केली. या तिन्ही कंपन्या भुजबळांशीच संबंधित असल्याचा आरोप आहे. एसीबीच्या माहितीनुसार ओरिजीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माजी संचालिका इरम तन्वीर शेख, निशी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माजी संचालिका गीता संजय जोशी आणि कुमोन इंजिनीअरिंग कंपनीचे संचालक एकनाथ नारायण मांडवकर या तिघांची वरळी येथील मुख्यालयात चौकशी एसीबीच्या विशेष तपास पथकाने केली. त्यांचे जबाबही नोंदवून घेतले. या तिघांना पुढील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
खासगी कंपन्यांच्या संचालकांची चौकशी
By admin | Updated: March 18, 2015 02:00 IST