शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पार्किंग, बेवारस वाहनांची एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:04 IST

महापालिकांना नगरविकास विभागाचे आदेश

- नारायण जाधव ठाणे : राज्यातील विविध महानगरांच्या क्षेत्रात सार्वजनिक रस्त्यांसह महापालिकांच्या मालकीचे मैदाने, मोकळ्या भूखंडावर होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंग आणि बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक महापालिकेने तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. यानुसार, व्हॉट्सअ‍ॅपसह मोबाइलद्वारे एसएमएस तक्रारपेटी आणि ईमेल सुविधा सुरू करण्यास सर्व महापालिकांना सांगण्यात आले आहे. हे आदेश राज्यातील २७ महापालिकांना लागू आहेत.राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे या मोठ्या महापालिकांच्या क्षेत्रात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीरपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण अलीकडे पार्किंग सुविधेच्या अभावी मोठ्या प्रमाणात वाढले आहे.याशिवाय बेवारस वाहनांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वाहतूककोंडीसह कायदा व सुव्यस्थेचे प्रश्नही निर्माण होत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.मात्र, महापालिकांचे प्रशासन आणि स्थानिक पोलीस याकडे कानाडोळा करीत आले आहेत. मात्र, आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना अशा वाहनांवर पोलिसांच्या मदतीने तक्रार निवारण यंत्रणाच कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेला पत्करावा लागला होता रोषठाणे महापालिकेने गेल्या आठवड्यात अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या अन् बेवारस सोडलेल्या सुमारे ४२ वाहनांवर कारवाई केली होती. तेव्हा महापालिकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते, शिवाय स्थानिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. मात्र, आता न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील महापालिकांना उपरोक्त प्रकारे तक्रार निवारण यंत्रणा सुरू करून, पोलिसांच्या मदतीने कालबद्ध कार्यवाहीकरिता धोरण निश्चित सोपे होणार आहे.निनावी तक्रारींची दखल घेण्याचे निर्देशयात निनावी तक्रारींचीही दखल घेण्यास सांगण्यात आले असून, तक्रार निवारण यंत्रणेस कार्यवाहीकरिता वृत्तपत्र प्रसिद्धी, सूचनाफलक, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरही प्रसिद्धी करून, जनतेस याविषयी अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, उपायुक्त दर्जांच्या अधिकाºयांमार्फत कार्यवाहीचा आढावा घेऊन तिचा अहवालही शासनास सादर करावा, असेही बजावले आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगWhatsAppव्हॉट्सअॅपTrafficवाहतूक कोंडी