मुंबई : कांदिवली पूर्व परिसरातील रिक्षा स्टॅण्ड हटविल्याविरोधात ह्यमुंबई रिक्षा मेन्स युनियनह्ण ने बुधवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. सत्तेच्या गुर्मीत स्थानिक लोकप्रतिनिधी रिक्षाचालकांना त्रास देत आहेत, असा आरोप युनियनकडून करण्यात आला. बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या रिक्षायुनियनच्या बोर्डमुळे स्टेशन परिसरात होणारी गर्दी आणि परिणामी घडणारे गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. कांदिवली पुर्वेकडील स्थानक परिसरातील आकुर्ली मार्गावर विविध युनियन्सचे सहा बोर्ड लावण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे रिक्षा चालक व्यवसाय करत होते . पालिका आणि पोलिसांनी गेल्या आठवड्यात हे बोर्ड हटवले. त्यामुळे आता सहा रंगांच्या जागी रिक्षा चालकांना या ठिकाणी एकच रांग लावुन भाडे स्वीकारावे लागत आहे. ज्यामुळे प्रवाशांची आणि रिक्षा चालकांची गैरसोय होत असल्याचे मुंबई रिक्षा मेन्स युनियन चे प्रमुख लक्ष्मीकांत त्रिमल यांनी लोकमतला सांगितले. ही कारवाई करण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदारांकडून दबाव आणल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवलीत रिक्षा चालकांचा बेमुदत संप
By admin | Updated: April 8, 2015 02:17 IST