शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सर्व प्रभागांसाठी मुलाखती; लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:52 IST

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वबळाचा नारा दिला.  त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल  असे चित्र आहे. पहिल्या दोन बैठका पार पडल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाजप-शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा पुढे सरकत नसल्याने ठाण्यात शिंदेसेनेने मंगळवारपासून १३१ जागांसाठी मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला. स्थानिक पातळीवर स्वबळाची चाचपणी दोन्ही पक्षांकडून सुरू असतानाच युतीचा निर्णय वरिष्ठ नेते जाहीर करतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांमधील संभाव्य बंड थोपविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. 

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वबळाचा नारा दिला.  त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल असे चित्र आहे. पहिल्या दोन बैठका पार पडल्या. 

भाजपने वरिष्ठांकडे ठाण्यातील ५२ जागांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत भाजपकडे २४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या काही जागांवर भाजपने दावा केला. मात्र, दुसऱ्या बैठकीनंतरही चर्चा पुढे सरकू शकलेली नाही.

भाजपची स्वबळ चाचपणी शिंदेसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केली. तसेच इच्छुकांना कामाला लागा असा सल्ला दिला. त्यामुळे युतीच्या संभाव्य शक्यतेमुळे नाराज इच्छुकांना हुरूप चढला आहे. तर दुसरीकडे मंगळवारपासून शिंदेसेनेनी १३१ प्रभागांसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत. आनंद आश्रम येथे खा. नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, रवींद्र फाटक, ए. एस. पाटील, हणमंत जगदाळे, हेमंत पवार, रमेश वैती यांनी मुलाखती घेतल्या.

मुलाखती आटोपल्याज्या प्रभागात अधिक इच्छुक होते, त्या ठिकाणच्या मुलाखती लांबल्या. मात्र जेथे इच्छुक कमी होते, त्या ठिकाणच्या मुलाखती दोन मिनिटांत उरकण्यात आल्या. एकीकडे मुलाखती सुरू असताना खा. म्हस्के यांनी भाजपसोबत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून, तो लवकरच जाहीर होईल, असा दावा केला. दोन्ही पक्षांकडून युतीच्या चर्चेचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवला. मात्र स्थानिक पातळीवरील चर्चा थांबली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane ward interviews held; Focus on senior leaders' decision.

Web Summary : With seat-sharing talks stalled, Shiv Sena (Shinde faction) began interviews for Thane wards. Both parties assess independent strength while awaiting senior leaders' alliance decision. BJP explores solo options amid Sena's interviews; alliance decision rests with higher-ups.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६