शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारचे सायलेंन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 00:35 IST

मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देकळवा पोलिसांची कारवाईसहा लाख ५० हजारांचे २५ सायलेंन्सर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेंन्सर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.कळवा, खारेगाव परिसरात राहणाºया रोशनी राऊत (५२) यांनी त्यांची मोटारकार ५ जून २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. तिचे सायलेन्सर चोरटयांनी लंपास केले होते. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ६ जून रोजी त्यांनी तक्र ार दाखल केली होती. याच घटनेचा तपास करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने कळव्यातील संभावित ठिकाणच्या सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये कारचे सायलेन्सर चोरणारी टोळीच कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरटयांची माहिती मिळवली असता, संशयित आरोपी हे मुंबईतील कुर्ला येथील असल्याची माहिती हाती लागली. पोलिसांनी कुर्ला येथील कपाडियानगर येथून समशुद्दीन शहा तसेच नदीम उर्फ नेपाळी नबाब कुरेशी (२१, रा. कुर्ला), समशुद्दीन मुजूउद्दीन (२२,) आणि सदाम खान (२६, रा. कलीना डोंगर, कुर्ला ) या चौघांना १३ जुलै रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी पुण्यातील चाकण, ठाण्यातील कळवा, कल्याण, विरार आदी २५ ठिकाणी चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेंन्सर जप्त केले आहेत.* यातील समशुद्धीन हा रायगड जिल्हयातील वेगवेळया पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल असलेल्या दहा गुन्हयांमध्ये पोलिसांना वांन्टेड होता. या टोळीकडून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि पुणे जिल्हयासह गोवा राज्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.* प्लाटेनियमसाठी व्हायची चोरी-कारचे सायलेंन्सर चोरल्यानंतर त्यातील जाळी काढून त्याची पावडर बनविली जायची. ती भट्टीवर वितळून त्यातून १० ग्रॅम प्लाटेनियम काढले जायचे. याच प्लाटेनियमची प्रती ग्रॅम दोन हजारांप्रमाणे दहा ग्रॅमला २० हजार रुपये, अशी विक्री केली जात होती. पुन्हा त्याच सायलेंन्सरची जुन्या बाजारात ही टोळी विक्री करीत होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी