शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने कार्यशाळा संपन्न

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 13, 2022 17:55 IST

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात आला. 

ठाणे: आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने वायू प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष केंद्रीत करुन सामूहिक उत्तरदायीत्व व सामुहिक कृतीच्या आवश्यकतेबाबत जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन ठाणे महानगरपालिका व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचेतर्फे संयुक्तपणे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेद्वारे या वर्षी हवा आपल्या सगळ्यांची या संकल्पनेस अनुसरुन आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात येत आहे. 

आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व कार्यशाळा यांचे आयोजन ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. याच मालिकेत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व उपआयुक्त अनघा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसाधना महाविद्यालयात कार्यशाळा व विद्यार्थ्यांसाठी हवा सर्वेक्षणाबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विश्वस्त कमलेश प्रधान यांनी पर्यावरण संवर्धन कार्यात महाविद्यालय नेहमीच ठामपास सहकार्य करेल असे आश्वासित केले. 

प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी महाविद्यालयाद्वारे सामाजिक बांधिलकी जपून नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत व शहरातील पर्यावरणीय प्रकल्पांमध्ये ठाणे महानगरपालिकेस नियमितपणे करत असलेल्या सहकार्याबाबत उपस्थितांना माहिती देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालयातील प्रा. डॉ. आसावरी टाक-शेणवाई यांनी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या यावर्षीच्या संकल्पनेस अनुसरून जागतिक स्तरावरील हवेच्या गुणवत्तेबाबत व हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केंद्र शासनाकडून उपलब्ध अनुदानातून ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याबाबत सादरीकरण केले. 

कार्यशाळा संपन्नठाणे महानगरपालिकेचे वैज्ञानिक अधिकारी ओम परळकर यांनी हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत आंतरराष्ट्रीय व देश पातळीवरील कायद्यांबाबत व नागरीकांच्या मुलभूत अधिकारांबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे वैज्ञानिक अधिकारी राजू जाधव यांनी हवा सर्वेक्षणाकरिता उपलब्ध असलेल्या विविध पद्धती व संसाधनांबाबत सादरीकरण केले. सभागृहातील या कार्यक्रमानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या फिरती प्रयोगशाळा वाहनामध्ये सर्वेक्षणाबाबतचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ठामपाच्या क्षेत्र अधिकारी संचिता कडलक यांनी दिले.

 

टॅग्स :thaneठाणेair pollutionवायू प्रदूषणcollegeमहाविद्यालय