शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 14:53 IST

कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि श्वास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मॉडेल महाविद्यालय व साकेत महाविद्यालय येथे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि श्वास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मॉडेल महाविद्यालय व साकेत महाविद्यालय येथे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. पूर्वेतील मॉडेल महाविद्यालयात डॉक्टर भूषण पाटील यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी तरुणांनी व्यसनापासून लांब राहिल्यास सुदृढ भारताची निर्मिती होऊ शकते असे मत आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. डॉक्टर विद्याधर गांगण यांनी तरुणांना आपण कशाप्रकारे छोट्या-मोठ्या पार्ट्या करत व्यसनाच्या जाळ्यात अडकतो हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

सकाळी ९ ते १० या वेळेत मॉडल महाविद्यालय कल्याण पूर्व येथे श्वास फाउंडेशन व  पोलीस स्टेशनच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. 10.30 ते 12.30 या वेळात साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व येथे डॉक्टर विजय चिंचोळे आणि डॉक्टर शेवाळे यांनी घेतले. डॉक्टर विजय चिंचवड यांनी अमली पदार्थ म्हणजे काय अमली पदार्थाचा वापर कोण कोणत्या वयात केला जातो अमली पदार्थाचे दुष्परिणाम कोणते अमली पदार्थ वापरल्यामुळे मानसिक व शारीरिक कोणता दुष्परिणाम जाणवतो याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉक्टर शेवाळे यांनी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यसनापासून दूर राहिला पाहिजे असे संबोधले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना आम्ही व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली.

पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांनी अमली पदार्थांच्या सेवनानंतर कोणकोणत्या गुणांची नोंद आपल्यावर होते या गुन्ह्यांना किती वर्षाची शिक्षा आहे अमली पदार्थ सेवनासाठी कायद्यात कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.हा संपूर्ण कार्यक्रम श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर पोटदुखी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संपूर्ण कार्यक्रमात २५० वर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस