शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

अंतर्गत मेट्रोला आता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:27 IST

सैनिक स्कूलसाठी असलेल्या आरक्षण बदलास महासभेची मंजुरी मिळाल्याने आता त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून तो आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

ठाणे : ठाण्यातील अंतर्गत मेट्रोचे कारशेडसाठी कावेसर आणि कासारवडवली येथील हरित विभाग आणि सैनिकस्कूलसाठी असलेल्या आरक्षण बदलास महासभेची मंजुरी मिळाल्याने आता त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून तो आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर या कामासाठी सल्लागार नेमून पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.ठाण्यातून मुख्य मेट्रोलाइन ही हायवेवरून जाणार असल्याने या मुख्य मेट्रोपर्यंत प्रवाशांना जाता यावे, यासाठी महापालिकेने अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मान्यता या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. अंतर्गत मेट्रोच्या कामासाठी शहरातील डीपी रस्त्यांचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या २९ किमीच्या मार्गांपैकी १८ किमीच्या डीपी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार, यासंदर्भातील रस्त्यांचे काही प्रस्तावही मंजूर केले आहेत. तसेच यामध्ये चार किमीच्या आरक्षित जागेचा वापर केला जाणार असून एचसीएमटीआर या वाहतूकव्यवस्थेसाठी सहा किमीच्या रस्त्यांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.>कासारवडवलीत १८ हेक्टरवर असणार कारशेडयापूर्वी अंतर्गत मेट्रोच्या कारशेडसाठी कोपरी आणि बाळकुम याठिकाणी आरक्षण ठेवले होते. मात्र, यामुळे सीआरझेडचे क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत मेट्रोचे आरक्षण करणे शक्य नसल्याने कावेसर आणि कासारवडवली या ठिकाणी ते होणार आहे.अंतर्गत मेट्रोचा विस्तार वाढवण्यात आला असून अस्तित्वात असलेल्या डीपी रस्त्यावरून ती धावणार असून थेट वडवलीपर्यंत मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार असल्याने याच ठिकाणी कारशेडचे आरक्षण ठेवण्यात येणार आहे. कासारवडवली येथे १८ हेक्टर जागेवर मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे.दरम्यान, यातील महत्त्वाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला दोन ते तीन महिन्यांत मान्यता मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. त्यानंतर, या कामासाठी सल्लागार नेमून या मार्गाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच, खºया अर्थाने या कामाला सुरुवात होईल, असे बोलले जात आहे.>पाच टप्प्यांत ९६०० कोटी खर्चून विकास : अंतर्गत मेट्रोचा विकास पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९६०० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात कळवा-मुंब्रा या मार्गाचा विचार केला जाणार आहे. २०२५ ला जेव्हा ठाण्यात अंतर्गत मेट्रो धावेल, तेव्हा दररोज पाच लाख प्रवासीसंख्या या मार्गावर अपेक्षित धरली आहे. दोन किमीच्या अंतरासाठी कमीतकमी १७ रुपये भाडे आकारले जाणार असून त्यानंतर जास्तीतजास्त १०४ रु पयांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे.>ठामपा काढणार६० टक्के कर्जमेट्रोच्या कामाचा खर्च हा सुमारे ९६०० कोटी एवढा असल्याने त्यासाठी ठाणे महापालिका ६० टक्के लोन काढणार आहे. तर, २० टक्के निधी केंद्र, २० टक्के पालिका स्वत: खर्च करणार असल्याचे बोलले जात आहे.ही असणार स्थानकेप्रस्तावित नवीन ठाणे स्थानक, रायलादेवी, वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्यनगर डेपो, शिवाईनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा-डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आजादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक परिसर, बाळकुमनाका, बाळकुमपाडा, राबोडी-शिवाजी चौक, ठाणे रेल्वेस्टेशन (भूमिगत)