शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत वाद उफाळला; शिवसैनिक, शहरप्रमुखात राडा, पाेलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 06:43 IST

या घटनेची शहरात चर्चा सुरु होती. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी येथील सामान्य शिवसैनिकांनी केली आहे.

मीरा रोड : भाईंदर शिवसेनेतील अंतर्गत वादंग रविवारी शिवसेना शाखेत उफाळून आला. घाणेरड्या शिव्या दिल्यावरून महिला शिवसैनिकाने शहरप्रमुखास मारले व काळे फासले. तर, त्या झटापटीत ती शिवसैनिकही जखमी झाली आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भाईंदर पोलीस ठाण्यासमोरच शिवसेनेची शाखा आहे. रविवारी दुपारी माजी शहर संघटक वेदाली परळकर या महिला बचत गटाबाबत काही महिलांना घेऊन शाखेत गेल्या होत्या. तेथे शहरप्रमुख पप्पू भिसे हे खुर्चीवरून उठून बाहेर गेले असता वेदाली त्या खुर्चीवर बसल्या. भिसे यांनी ते पाहिले व खुर्चीत बसण्यावरून वेदाली यांना शिवीगाळ सुरू केली. घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणून भिसे यांना जाब विचारला व त्यावरून भांडण थेट हातघाईवर आले. शाखेच्या बाहेरही वेदाली व अन्य काही महिलांनी भिसे यांना मारायला सुरुवात केली. यात वेदाली यांच्या हातावरही जखमा झाल्या आहेत. भाईंदर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बाजारातच हा शिवसेनेचा राडा झाल्याने एकच गर्दी झाली होती. वेदाली यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी भिसे यांच्यावर विनयभंगासह मारहाण व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भिसे यांनीही वेदालीसह अन्य सहा ते सात महिलांवर एकत्र मिळून मारल्याची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिसे यांनी काही जणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात शनिवारी केला होता. तेव्हा महिला पदाधिकाऱ्यांना न बाेलावल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा आराेप भिसे यांनी केला. 

पाेलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरणशिवसेनेतील या राड्यानंतर विरोधी पक्षनेते धनेश पाटील, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक राजू भोईर, विक्रमप्रताप सिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलीस ठाणे परिसरात गर्दी केली होती. यामुळे पोलीस ठाण्याबाहेरही दोन गटांत तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पाेलिसांनी त्यांना तंबी हुसकावून लावले.

दरम्यान, या घटनेची शहरात चर्चा सुरु होती. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी येथील सामान्य शिवसैनिकांनी केली आहे. अंर्तगत वाद उफाळून आल्याने भविष्यात याचे परिणाम दिसू लागतील असे येथील राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिसPoliticsराजकारण