पालिकेच्या मंडईमध्ये चक्क चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:28 AM2020-02-15T00:28:55+5:302020-02-15T00:29:38+5:30

ग्राहकांना झाला त्रास : पालिकेची परवानगी घेतली नव्हती

Intense filming in the municipality | पालिकेच्या मंडईमध्ये चक्क चित्रीकरण

पालिकेच्या मंडईमध्ये चक्क चित्रीकरण

Next

भार्इंदर : मीरा- भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर दिलेल्या मंडईचा वापर चक्क चित्रीकरणासाठी केला जात आहे. यासाठी भाडे आकारले जात आहे. चित्रीकरणाची परवानगी घेतली नसल्याचे प्रभाग अधिकारी सांगत असले तरी कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने मात्र चित्रीकरणासाठी परवानगी घेतली असल्याचे उत्तर दिले.


शहरातील रस्त्यांवर बसणारे भाजी, फळ विक्रेते आदी फेरीवाल्यांना महापालिकेने विविध आरक्षणांचे तसेच नाल्यांवरच्या स्लॅबवर मंडइसाठी परवानदी दिली आहे. मंडईसाठी शेड बांधून देण्यासह त्या ठिकाणी देखभाल ठेवणे व त्या बदल्यात फेरीवाल्यांकडून रोजचे शुल्क आकारण्याचे कंत्राट दिले आहे. मूळात जागेचा उद्देश व केला जाणारा वापर, नाममात्र दरात दिलेले कंत्राट, फेरीवाल्यांची पडताळणी न करताच त्यात कंत्राटदाराने बसवलेले फेरीवाले, जास्तीचे वसूल केले जाणारे शुल्क आदी अनेक मुद्दे उपस्थित झाले असताना कंत्राटदार व त्यामागील सूत्रधार हे सत्ताधारी भाजप नेतृत्वाच्या मर्जीतील असल्याने प्रशासन गप्प असल्याचा आरोप होत आहे.


रामदेव पार्क येथील मंडईचा वापर चक्क चित्रीकरणासाठी केला गेला. या ठिकाणी आवश्यक सामान आणले होते.
मंडईमध्ये नृत्य चित्रीत केले जात होते. त्यामुळे मंडईत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या चित्रीकरणाचा त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता प्रभाग समिती कार्यालयाकडून मंडईत अशा कोणत्याही चित्रीकरणास परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले.

माझा काहीही संबंध नाही- पुरोहित
मधुसुदन पुरोहित यांनी मात्र, मंडईतील चित्रीकरण विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी होते. ती वाणिज्य स्वरुपाची नव्हती. आधी त्यांचे चित्रीकरण रद्द झाले होते. त्यात माझा कंत्राटदार म्हणून काही संबंध नाही असे मधुसुदन पुरोहित यांनी सांगितले. या भागातील रहिवासी निलेश साहू यांनी मात्र कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

Web Title: Intense filming in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.