शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

नूतन वर्षात ठाणेकरांना बौद्धीक मेजवानी, ९ जानेवारीपासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 3, 2023 18:35 IST

रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष आहे.

ठाणे: रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला यंदा ९ ते १५ जानेवारी दरम्यान होत आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष असून कोविड काळानंतर प्रथमच नौपाड्यातील सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात होत आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे संस्थापक, अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापालिकेचे माजी भाजप गटनेते मनोहर डुंबरे, माजी उपमहापौर सुभाष काळे, शरद पुरोहीत, माधुरी ताम्हाणे, डॉ.किर्ती आगाशे, सुहास जावडेकर आणि परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानामाला ठाणेकरांसाठी बौध्दिक मेजवानी असल्याने या व्याख्यानमालेची आवर्जून वाट पाहिली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या बंदिस्त सभागृहात पार पडली. यंदा मात्र खुल्या पटांगणात व्याख्यानमाला होत असून ९ ते १५ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ८.१५ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. सोमवारी ९ जानेवारी रोजी राजकिय विश्लेषक प्रा.संगीत रागी हे 'आझादी का अमृतमहोत्सव' यावर भाष्य करणार आहेत. त्यानंतर मंगळवार १० जानेवारी रोजी डायबेटीस अपाय आणि उपाय या विषयावर डॉ.तुषार रेगे श्रोत्यांना आरोग्यमंत्र देतील. बुधवारी ११ जाने. रोजी मिशन आयएएसचे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे हे 'आव्हान स्पर्धा परिक्षांचे, गुरुवारी १२ जाने. ला सुप्रसिद्ध गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत डॉ.किर्ती आगाशे घेतील. तर शुक्रवार १३ जाने.ला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश उदय लळीत संसदीय विशेषाधिकार आणि संसद अवमानना अधिकार यावर माहिती देतील. तर शनिवार १४ जानेवारी रोजी "दीपस्तंभ" आधार निराधारांचा या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्य़ाख्यान असेल. तर समारोपास रविवार १५ जानेवारी रोजी चाणक्य फेम अभिनेता, सिनेदिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी 'उज्वल इतिहास से अमृतकाल की ओर' यासंदर्भातील किस्से उलगडतील.

गेली ३६ वर्षे ही व्याख्यानमाला ठराविक दिवशी याच ठिकाणी आयोजित केली जात असून विशेष म्हणजे आतापर्यंत २४६ मान्यवरांनी या माध्यमातुन श्रोत्यांना मार्गदर्शन केले आहे. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर व्याख्यानमाला आधारलेली असून ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही व्याख्यानमाला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते.असेही आ.संजय केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे