लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मीटरची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता वैशाली बडे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश मांडलेकर यांच्यासह चौघा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणाºया विलास भोईर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.वीज वितरणच्या सहाय्यक अभियंता बडे, वरिष्ठ तंत्रज्ञ मांडलेकर, तंत्रज्ञ संदीप कडूकर आणि राकेश गावीत हे वीज बिलाची थकबाकी आणि मीटर पडताळणीसाठी कोपरी गावातील गंगाधाम इमारतीमध्ये २ आॅगस्ट रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास गेले होते. मीटरमध्ये फेरफार आढळल्यामुळे गणेश भोईर यांना त्यांनी घराबाहेर बोलविले. त्याचवेळी नादुरुस्त मीटर काढून तिथे पडताळणीसाठी दुसरे मीटर लावत असतांनाच विलास भोईर यांनी हे दोन्ही मीटर जमीनीवर आपटून त्यांची नासधूस केल्याचा आरोप आहे. तर निलेश यांच्या शर्टाची त्यांनी कॉलर पकडली. याप्रकरणी निलेश यांनी कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वीज वितरणच्या महिला अधिकाऱ्यांसह चौघांना शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:52 IST
मीटरची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता वैशाली बडे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश मांडलेकर यांच्यासह चौघा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करणाºया विलास भोईर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल झाला आहे.
वीज वितरणच्या महिला अधिकाऱ्यांसह चौघांना शिवीगाळ
ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा