शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी जनरल डायरप्रमाणे आम्हाला गोळ्या घालाव्यात, आनंद परांजपेंचं पोलीस आयुक्तांना आव्हान 

By अजित मांडके | Updated: March 4, 2023 18:08 IST

"आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला." 

ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातील भादंवि ३०७ हे गंभीर कलम संशयास्पद आहे, असे निरीक्षण ठाणे सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. ठाणे पोलिसांकडून वारंवार असे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.  अशा पद्धतीने गुन्हे दाखल करणारे पोलीस आयुक्तलय आम्हाला जनरल डायर असल्यासारखेच वाटत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोलीस मैदानात बोलवावे अन् थेट गोळ्या घालाव्यात. आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. 

परांजपे म्हणाले की, डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनाचा निर्णय देताना न्यायालयाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध पाच खटल्यांचा आधार घेतला. तसेच आपले निरीक्षण नोंदविताना,  केवळ तक्रारदार सांगतो म्हणून हल्ला करणार्‍यांच्या हातात हत्यारे होती, असे होत नाही. आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानेच तक्रारदाराने आव्हाड यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले आहे. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या एकाही चित्रणामध्ये कोणतेही शस्र दिसत नाही. ही मारहाण हात आणि बुक्क्यानी झाल्याचे दिसत आहे. कोणतेही शस्त्र वापरलेले नसल्याने ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने दाखल केलेला भादंवि ३०७ हा कलम संशयास्पद आहे, असे नमूद केले आहे.  ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लवकरच ठाणे पोलिसांच्या विरोधात ठाणेकर ‘जनद्रोह’ करतील. आपणाला कधी-कधी पोलीस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर असल्यासारखे वाटते असेही परांजपे म्हणाले.  या प्रकारामागे कोण आहे, असे विचारले असता, ‘खोटे गुन्हे दाखल करण्यात ठाणे पोलीस आघाडीवर आहेत. पोलीस आयुक्तांचे सहकारी उगले हेदेखील या कामात पुढाकार घेत आहेत. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दबावाखालीच होत आहे. त्यांच्या थेट इशार्‍यावरच हे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असेही परांजपे म्हणाले. 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस