शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

वाहन चालवताना घाला हेल्मेट अन् करा मोबाइल चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:47 AM

देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणारांची संख्या अधिक आहे. हीच बाब गांभीर्याने घेत अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक विभागाने नुकतीच हेल्मेटसक्ती केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने ती बारगळली.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणारांची संख्या अधिक आहे. हीच बाब गांभीर्याने घेत अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक विभागाने नुकतीच हेल्मेटसक्ती केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने ती बारगळली. पण, आता हेल्मेट घातल्यावर जीवाच्या सुरक्षेबरोबरच मोबाइलही चार्ज करणे शक्य होणार आहे. मुंब्रा येथील ज्ञानदीप विद्यामंदिरातील शिक्षक हेमंत नेहेते यांनी सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने सोलर हेल्मेट विकसित केले आहे.सुरक्षित प्रवासासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. एका खाजगी कंपनीच्या सर्वेक्षणानुसार ५७ टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. मागील दशकात अपघाती मृत्यूंचे प्रमाण ५४.२ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ मध्ये रस्ते अपघातांत एक लाख ५१ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यातील ६० नागरिक १८ ते ४५ या वयोगटांतील होते. अपघातांमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण तीन टक्के आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सोलर मोबाइल चार्जर (स्मार्ट हेल्मेट) विकसित करण्याची कल्पना सुचल्याचे नेहेते यांनी सांगितले.नेहेते म्हणाले, ‘अ‍ॅण्ड्राइड मोबाइल वापरणारांची संख्या अधिक आहे. पण, इंटरनेटवापरामुळे मोबाइलची बॅटरी लवकर संपते. चार्जिंगची सुविधा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतेच, असे नाही. त्यामुळे हेल्मेट आणि मोबाइल चार्जर विकसित करण्याची कल्पना सुचली. सोलर प्लेटचा वापर या स्मार्ट हेल्मेटमध्ये केला आहे. त्यामुळे वाहन चालवताना मोबाइलची बॅटरी चार्ज करता येते. तसेच गाडी खुल्या पार्किंगमध्ये लावल्यास तेथेही बॅटरी चॉर्ज होऊ शकते. त्यामुळे दुचाकीस्वार मोबाइल चार्जिंगसाठी का होईना हेल्मेट वापरतील, असे नेहेते म्हणाले.स्मार्ट हेल्मेट प्रकल्पाचे सादरीकरण इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी ईश्वरी पाटील हिने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात केले होते. त्यावेळी तिने सोलर प्लेटसोबत एक अ‍ॅल्युमिनियमची चौकट या हेल्मेटमध्ये लावली होती. परंतु, अपघातात ती प्लेट चालकाला लागू शकते, अशी शंका काहींनी उपस्थित केली. या प्रदर्शनात प्रकल्पाने प्रथम क्रमांकाची बाजी मारली. जिल्हास्तरीय प्रदर्शनात दोन सोलर प्लेट बसवल्या. यातही प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मात्र, राज्यस्तरीय प्रदर्शनात या हेल्मेटमध्ये बदल करण्यात आला. या वेळी छोटछोट्या ३० ट्युब वापरण्यात आल्या. या ट्युब वायरने एकमेकींना जोडण्यात आल्या. यातून इनपुट ३.७ ते ६ होल्ड डीसी मिळत होते. मोबाइल चार्जिंगसाठी पाच होल्ड डीसी इतक्या ऊर्जेची गरज असते. संतुलन प्रमाणात मोबाइल चार्जिंग होत होता. मोबाइल चार्ज करताना त्याचा स्फोट होणार नाही, याची काळजी घेतली आहे. विज्ञान प्रकल्पासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव समीर देसाई, शिवानी देसाई, प्रवीणा देसाई, मुख्याध्यापिका उषा शिंदे, शिक्षक नंदकिशोर चौधरी यांचे सहकार्य लाभले.राज्यस्तरीय प्रदर्शनात महाराष्ट्रातून १२७ प्रकल्प सादर झाले. त्यातून आठ पारितोषिके देण्यात आली. त्यामुळे या प्रदर्शनात यश थोडेसे हुकले असले, तरी आम्ही थांबणार नाही. ‘इन्स्टायर’ या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नेहेते यांनी सांगितले. शाळेने यापूर्वी अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत हा प्रकल्प राष्ट्रीयस्तरावर नेला आहे. तसेच भ्रमणध्वनीद्वारे जलसंवर्धन व जलसिंचन हाही प्रकल्प मांडला आहे.आपत्कालीन बटणस्मार्ट हेल्मेटला एक बटण बसवले आहे. हेल्मेट वापरकर्ते अडचणीच्या वेळी त्याचा वापर करू शकतात. हे बटण दाबल्यास पोलिसांच्या गाडीप्रमाणे सायरन वाजतो. त्यामुळे चालक अडचणीत असल्याचे अन्य नागरिकांना समजून ते मदतीला येतील, असे नेहेते म्हणाले.सुटीच्या दिवशी गॅलरीत हेल्मेट ठेवूनही मोबाइल चार्जिंग करता येऊ शकतो. मोबाइल चार्जिंगसाठी एक ते दीड युनिट वीज लागते. त्यामुळे दिवसाला पाच रुपये याप्रमाणे महिन्याची १५० रुपयांची बचत होऊ शकते.हेल्मेटसाठीचा खर्च : हेल्मेट बाजारातून ४०० रुपयांना विकत घेतले आहे. त्यावर सोलर सिस्टीम बसवण्यासाठी ६०० रुपये खर्च आला. त्यामुळे साधारण एक हजारात हे स्मार्ट हेल्मेट उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :thaneठाणे