शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांच्या ‘भेटीगाठीं’ची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:48 IST

स्थायी समिती ही विकासकामे करणारी समिती नसून ती कलेक्शन कमिटी असल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवल्या आहेत.

ठाणे : स्थायी समिती ही विकासकामे करणारी समिती नसून ती कलेक्शन कमिटी असल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवल्या आहेत. स्थायी समिती सभापतींच्या पीएकडून ठेकेदारांना केलेल्या फोन प्रकरणावरून ठाणेकर संतापले आहेत. यापूर्वी केवळ चर्चा सुरू होती. आता तर चक्क ‘भेटीगाठी’साठी फोन करण्यात येत आहेत, हे लाज सोडल्याचे लक्षण असून याची चौकशी करण्याची मागणी ठाणेकरांनी केली आहे.सभापतींच्या पीएकडून काही ठेकेदारांना भेटीगाठींसाठी फोन करण्यात आले होते. विकासकामांची माहिती घेण्यासाठी ठेकेदारांना बोलावल्याची प्रतिक्रिया सभापतींनी दिली. विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेणे अपेक्षित होते. ठेकेदारांना बोलवायची गरजच काय, असा सवाल ठाणेकर करत आहेत.अधिका-यांशिवाय डाळ शिजणे अशक्यस्थायी समितीची गरजच कशासाठी, असा सवाल करून काहींनी ती बंद करण्याची मागणी केली. यापूर्वी वर्षभर ही समिती गठीत झाली नव्हती. तेव्हा विकासकामे झाली नाहीत का, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे. यामध्ये केवळ लोकप्रतिनिधींची साखळी आहे, असे म्हणता येणार नाही, तर यात काही अधिकारीही सहभागी असू शकतात. त्यांच्या सहभागाशिवाय ही डाळ शिजूच शकणार नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. आता सभापतींनीच आपण कोणत्या विकासकामांची माहिती घेतली, हे जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया करदात्या ठाणेकरांनी दिली आहे.मुंबई महापालिकेची स्थायी समिती ही अंडरस्टँडिंग समिती असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनीच केला आहे. त्यात आता ठाणे महापालिकेतील समिती त्याच पद्धतीने कारभार करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यापूर्वी महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत नंदलाल समिती नेमली होती. त्या घोटाळ्याचे काय झाले. १८ वर्षे उलटून गेली तरी एकालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे आजही आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही, असा ग्रह केलेल्या या मंडळींची कातडी गेंड्याची झाली आहे.-नितीन देशपांडेमुळात विकासकामांची माहिती ही पालिकेतील अधिकारी देऊ शकतात की ठेकेदार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सभापतींच्या अशा उत्तरामुळे नक्कीच शंका उपस्थित होऊ शकतात.- स्नेहलता पवारयापूर्वी ठाणे महापालिकेत विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. अनेक घोटाळ्यांची चौकशी लागली. त्यात अनेक लोकप्रतिनिधींसह अधिकाºयांवर ठपके ठेवण्यात आले. त्यांचे पुढे काहीच झाले नाही, त्यामुळेच आजही अशा प्रकारे स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग होत आहे.- रवी जडे

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे