शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:51 IST

 ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून,  रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याचबरोबर, सध्याच्या रस्त्याच्या संपूर्ण डागडुजीचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती ...

 ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून,  रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याचबरोबर, सध्याच्या रस्त्याच्या संपूर्ण डागडुजीचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

पालकमंत्री  शिंदे यांच्या सूचनेनुसार रेतीबंदर ते वाय जंक्शन अशा उन्नत मार्गाचा अभ्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने केला असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवला आहे. या मार्गाच्या बाजूने संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. हा मार्ग झाल्यानंतर मुंब्रा बायपास मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक निर्वेधपणे सुरू राहणार असून अपघातांनाही आळा बसणार आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बायपास रस्त्याच्या सर्वंकष दुरुस्तीचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार खड्डे दुरुस्ती, रस्त्याच्या वस्तीकडील बाजूने संरक्षक भिंत, गॅबियन वॉल, डिव्हायडरची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रस्त्याचे बेअरिंग बदलणे आणि दुरुस्ती, दरडी कोसळू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय यांचाही समावेश असून एकूण ८ कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात येत आहेत.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे