शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, मुलीला दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:17 IST

शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीत राहण्याऱ्या अनिल व सीमा तलवार या दांम्पत्याने त्यांच्या घरी घर काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण केली आहे.

ठळक मुद्देशहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीत राहण्याऱ्या अनिल व सीमा तलवार या दांम्पत्याने त्यांच्या घरी घर काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण केली आहे. तिला चक्क चटके देऊन तिचा छळ करण्यात आला आहे. मुलीने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन पळ काढल्याने हा प्रकार उघडीस आला आहे.

कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीत राहण्याऱ्या अनिल व सीमा तलवार या दांम्पत्याने त्यांच्या घरी घर काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण केली आहे. तिला चक्क चटके देऊन तिचा छळ करण्यात आला आहे. मुलीने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन पळ काढल्याने हा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तलवार दांम्पत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

तलवार यांच्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला तलवार यांनी दिल्लीहून आणले होते. ती त्यांच्या घरी काम करीत होती. पीडित मुलीला तलवार यांनी मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की तिच्या अंगावर सगळे व्रण उठले आहे. तिच्या अंगाला चटके देण्यात आलेले आहेत. पीडित मुलगी या सगळ्या त्रासाला कंटाळून कशीबशी तलवार यांच्या तावडीतून बाहेर पडली. पीडित मुलगी बाहेर पडल्यावर नागरीक व समाजिक कार्यकर्ते मनोज ठाकूर यांच्या मदतीने पोलीस नियंत्रम कक्ष गाठले. पोलीस नियंत्रण कक्षाने तिला खडकपाडा पोलीस ठाण्यास पाठविले. खडकपाडा पोलीस ठाण्यात मुलीला ठेवण्यात आलं. 

पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला आहे. सुरुवातीला पोलिसानी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते ठाकूर यांनी पोलिसांचा होरा पाहून पुढील हालचाली करण्याची वार्ता केल्यावर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पीडित मुलगी ही मूळची झारखंड येथील आहे. तिला एका प्लेसमेंट चालक अजयकुमार याने मुलीला दिल्ली येथे कामाला लावण्याचे आमिष दाखवून दिल्लीत आणले. दिल्लीहून तलवार यांनी मुलीला कल्याणच्या घरी घरकामासाठी आणले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुलीसोबत अन्य कोणता प्रकार झाला आहे का याचा संशय व्यक्त केला जात असून त्या अनुशंगाने तपास सुरू झाला आहे.

पोलिसांकडे मुलगी सज्ञान असल्याचे कागदपत्रे सादर केली असली तरी मुलीनेच स्वत: ती पंधरा वर्षे वयाची असल्याचे सांगितल्याने वयाचा पेच आहे. तो वैद्यकीय तपासणी अंती सुटणार आहे.  दरम्यान यासंदर्भात अनिल तलवार व सीमा तलवार यांनी मुलगी अठरा वर्षाची असून ती सज्ञान आहे. मुलीने केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचं म्हटलं आहे.