शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

माहिती देण्यास टाळाटाळ: ठाणे महापालिकेला राज्य माहिती आयुक्तांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:30 IST

माहिती देण्यास जनमाहिती अधिकाऱ्याने टाळाटाळ केल्याबद्दल राज्य माहिती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये निष्काळजी केल्याबद्दल दंड आकारण्याची नोटीसही आयोगाने ठाणे पालिका प्रशासनाला बजावली आहे.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता मोहन कलाल यांच्या निष्काळजीपणाबद्दल व्यक्त केली नाराजीवर्ष उलटूनही माहितीच दिली नाहीदंड आकारण्याची दिली नोटीस

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वर्तकनगर इमारत क्रमांक ५४ आणि ५५ च्या पुनर्विकासाबाबतची माहिती मागूनही संबंधित जनमाहिती अधिकारी वारंवार टाळाटाळ करीत असल्याबद्दल राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तर अन्य एका प्रकरणात पालिका प्रशासनाला दंड का आकरण्यात येऊ नये, याचाही खुलासा करण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी दिले आहेत.वर्तकनगर येथील रहिवाशी तथा मनसेचे पदाधिकारी संतोष निकम यांनी वर्तकनगर इमारत क्रमांक ५४, ५५ यांच्या पुनर्विकासाबाबत वास्तुविशारद यांच्या फी पावती मिळण्याची तसेच इमारत क्रमांक ५४ च्या बाजूला असलेल्या आनंद निवास इमारतीची माहितीचा अधिकारांतर्गत ठाणे महापालिकेच्या बीएसयुपी विभागाचे जन माहिती अधिकारी यांच्याकडे २४ मार्च २०१७ रोजी माहिती मागितली होती. ती वेळेत न मिळाल्याने त्यांनी पुन्हा १ मे २०१७ रोजी बीएसयुपी विभागाच्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी पुनहा अर्ज केला. त्यानंतरही पुन्हा २६ जुलै २०१७ रोजी त्यांनी हीच माहिती मागितली. तसेच बीएसयुपीच्या कार्यकारी अभियंत्यांकडेही २१ डिसेंबर २०१६ रोजी याच संदर्भातील माहिती पत्राद्वारे मागितली. वारंवार मागणी करुनही त्यांना माहिती उपलब्ध न झाल्याने आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त थेकेकरा यांच्याकडे याबाबतची २० मार्च २०१८ रोजी (अपिल क्रमांक ३१५३/२०१७) सुनावणी झाली. १५ दिवसांमध्ये नि:शुल्क माहिती देण्याच्या आदेशाबरोबरच जी माहिती उपलब्ध नाही, त्याबाबत स्पष्ट मुद्देनिहाय उत्तर १५ दिवसात द्यावे. तसेच या सुनावणीला जन माहिती अधिकारी अनुपस्थित राहिले. त्यांचे प्रतिनिधी यांनाही यातील काहीही माहिती नाही. सुनावणी दरम्यान कोणताही युक्तिवाद केलेला नाही. जन माहिती अधिकारी मोहन कलाल यांच्या निष्काळजीपणाबद्दल आयोग तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचा ठपकाही ठेवला. भविष्यात या अधिकाºयांनी सुनावणीला उपस्थित राहण्याची दक्षता घेण्याची ताकीदही आयोगाने दिली. अपरिहार्य कारण असेल तरच सक्षम अधिकाºयाला सुनावणीला पाठवावे, असेही यात म्हटले आहे.प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अपिलावर सुनावणी आयोजित करुन निर्णय देणे अपेक्षित होते. परंतू, तशी कार्यवाही न झाल्याने त्यांच्याही निष्काळजीपणाबद्दल आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व प्रलंबित अपिलांचा आढावा घेऊन सुनावणीने निर्णय देण्याचे आदेश आयोगाने बजावले. अर्जदाराला माहिती न मिळाल्याने सकृतदर्शनी या प्रकरणात जन माहिती अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपकाही ठेवला. अर्जदाराला अर्ज केल्यापासून ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक असल्याची समजही देण्यात आली आहे. याच दुर्लक्षपणाबद्दल जन माहिती अधिकारी कलाल यांना दंड का आकारला जाऊ नये, याचे स्पष्टीकरणही त्यांनी ८ मे २०१८ पर्यंत स्वत: सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यांच्यासह सर्व जबाबदार अधिकाºयांना ही नोटीस बजावावेत, असेही आदेशात म्हटले आहे.तसेच अपिल क्रमांक ३१५४ आणि ३१५५ यावरही आयोगाने अशाच प्रकारे आदेश बजावून जन माहिती अधिकारी यांना शास्ती अर्थात दंड का आकारु नये, अशी नोटीस बजावली आहे.या दोन्ही अपिलांमध्येही राज्य माहिती आयोगाने जन माहिती अधिका-यांच्या निष्काळजीपणाबद्दल शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला आहे.एकीकडे महापालिकेतील माहिती मागविणा-या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असतांनाच ठाणे महापालिका प्रशासनाला आयोगाने बजावलेल्या या नोटीसीने पालिका वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार