शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या मूर्तींवर जीएसटीमुळे आले महागाईचे विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:47 IST

कारागिरांचा वाढलेला पगार, यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : सर्वच कच्च्या मालावर लागू झालेला जीएसटी तसेच कारागिरांचा वाढलेला पगार, यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. सध्या कारखान्यांत मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू असून गणेशभक्तदेखील मूर्तींच्या बुकिंगला मूर्तिकारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.सप्टेंबर महिन्यात श्री गणरायाचे आगमन होणार आहे. कारखान्यांत मूर्तिकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिने राहिल्यामुळे मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडे कामाला असणारे कारागीर हे रंगकामात गुंतले आहेत. परंतु, यंदा सर्वच कच्च्या मालावर लागू झालेल्या जीएसटीची झळ गणेशमूर्तींना बसली आहे. याआधी डायमंड आणि ठरावीक रंगांवर जीएसटी लागू होता.परंतु, यंदा माती, पीओपी, सर्वच रंग यांवर तो लागू झाल्याने मूर्तींचे दर वाढले आहेत, अशी माहिती मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.>यामुळे वाढली किंमतगेल्या वर्षी १४०० ते २५००० रुपयांना विकल्या गेलेल्या मूर्तींचे दर यंदा १५०० ते २८,००० रुपये आहेत. १५० रुपये दराने मिळणारी मातीची गोणी जीएसटीमुळे १७५ रुपये दराने, तर २०० रुपयांचा रंग हा जीएसटीमुळे २३० रुपयांना मिळत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. ज्यांना मूर्तिकाम येते, अशाच कारागिरांना कामावर ठेवू शकतो. परंतु, आता तेदेखील कमी होत असल्याने जे आहेत, त्यांना हाताशी घेऊन काम करावे लागते. मात्र, त्यांनीही आपला पगार वाढवल्यामुळे मूर्तींच्या दरात वाढ करावी लागली असल्याचे मूर्तिकार प्रवीण पातकर यांनी सांगितले.कारागिरांचा पगार वाढत असल्यामुळे मूर्ती कमी केल्या असून आमचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतले असल्याचे पातकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले. गणेशोत्सवाला दोन महिने असल्याने मूर्तींच्या बुकिंगला हळूहळू सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू झाला की, बुकिंगलादेखील जोर येईल तसेच मूर्तींच्या कामालादेखील वेग येईल.