शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारत - इस्रायलचे संबंध दृढ व्हावेत - डॉ. डी.बी. शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:10 IST

भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी

ठाणे : भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी केले. भारत आणि इस्रायल एकत्र येऊन काँक्रिट वर्ल्ड तसेच शांततेचे, विश्वासाचे जग निर्माण करू शकतात, असेही ते म्हणाले.व्यास क्रिएशन्सतर्फे ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या मराठी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे बुधवारी पार पडला. या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शेकटकर उपस्थित होते. ते म्हणाले की, भारत-इस्रायलमध्ये चांगले संबंध आहेत. कोणतेही राष्ट्र, राज्य, राष्ट्रनेता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रहित तयार करत असतात. जिथे राष्ट्रनीतीच्या संरक्षणासाठी राजनीती-कूटनीती ही वेगळी झाली, तिथे युद्धनीती करावी लागते. ज्यांचा संबंध युद्धशास्त्र, रणशास्त्राबरोबर आहे, त्यांना वास्तविकता माहीत असावी. ही वास्तविकता आपण पहिल्या महायुद्धात पाहिली आहे. भारताकडे जग हे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. कोणतेही राष्ट्र हे छोटे किंवा मोठे नसते. इस्रायलच्या आजूबाजूला अनेक राष्ट्रे आहेत. परंतु, कोणाला मित्र म्हणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना तेथील नागरिक हे ठामपणे उभे आहेत. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जिथे विजय मिळवला, तिथे भारतीय सैनिक होते, ही वास्तविकता आहे. कोणत्याही राष्ट्रावर येणारे संकट हे जगण्याची कला शिकवून जाते. एकोणिसाव्या शतकात आपण मसल्स पॉवर, विसाव्या शतकात मनी पॉवर पाहिली, तर एकविसाव्या शतकात सैनिक आणि समाजाची शक्ती हवी. जे राष्ट्र, समाज आपल्या शूरवीरांचे पराक्रम विसरतात, ते अधोगतीच्या दिशेने जातात, असे परखड मत व्यक्त केले. ज्या देशात महिला असुरक्षित आहेत, तिथे सुरक्षित समाज कसा निर्माण होईल, असा सवालही उपस्थित केला.अ‍ॅड. लेवी ए. रुबेन्स यांनी भारत-इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रगती करावी, हे दोन्ही देश शांतताप्रिय असल्याने त्यांनी एकत्र यावे. आपल्या देशातील सैनिकाला दुसºया देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण येते, तेव्हा तो आपल्या देशाची प्रतिष्ठा सांभाळतो. भारतीय सैनिकांचे योगदान पोहोचवण्यासाठी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. रवी कुमार म्हणाले की, भारत आणि इस्रायल ही एक मोठी शक्ती बनू शकते. हे दोन्ही देश मित्र आहे, आणखी चांगले मित्र होऊ शकतात. कार्यक्रमाला पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे वर्षा कोल्हटकर, अनिल कोल्हटकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड व इतर उपस्थित होते. याप्रसंगी याच पुस्तकाच्या ई-बुकचेदेखील प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे