शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

गॅसच्या वाढत्या किमती मजूर कुटुंबांना परवडेना; उज्ज्वला योजना अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 11:04 PM

स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील कोटयावधी महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले.

- राहुल वाडेकरविक्रमगड : स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील कोटयावधी महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले. मात्र, या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या मजुर कुटुबांना त्याच्या वाढत्या किमती परवडत नसल्याने आदिवासी पाड्यांवर गॅस शेजारीच पुन्हा चुली पेटल्या आहेत.मजुरी करणाºया पुरु षास २०० ते २५० तर महिलांना १५० ते २०० रुपये मजुरी मिळते. यामध्ये त्यांना साºयाच घराचा उदरिनर्वाह करावा लागतो. त्यात जेमतेम दोनवेळचे जेवण देखील होत नाही मग ९०० रूपयाचा गॅस सिलेंडर काय खरेदी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरी सिलेंडर व शेगडी दिसत असली तरी प्रत्यक्ष स्वयंपाक चुलीवर केला जात आहे. भात शेती पावसाअभावी करपल्याने शेतकºयांच्या हातातले उत्पन्न गेले. त्या शेतीत मजूरी करणाºयांच्या हातांचे कामही गेल्याने शेतमजुरांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच वीट भट्ट्या डबघाईला आल्या आहेत. एकंदरीतच मजुरवर्गामध्ये रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा असल्याने गॅस सिलेंडरसाठी पैसे कुठून आणणार अशी स्थिती आहे. गडदे गावातील गणेश भोये यांनी हाताला काम नसल्याने घरामध्ये गॅस सिलेंडर आणू कसा असा प्रश्न मांडला.आठ महिन्यांतच २८९ रुपयांची वाढघरगुती गॅस सिलिंडरचा दर एप्रिलमध्ये ६४५ रु पये होता. जूनमध्ये ते ६९१, ऑगस्टमध्ये ७८४, तर नोव्हेंबरमध्ये ९३४ रुपयांपर्यंत पोहचले. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतच २८९ रु पयांची वाढ झाली आहे. एकत्र कुटुंब असलेल्या मोठ्या घरासाठी महिन्याला दोन सिलिंडर लागतात. त्यांची जास्तच आर्थिक कोंडी होत असून हे वाढत जाणारे गॅसचे भाव महिलांना पुन्हा लाकडांच्या चुलींकडे घेऊन जाताना दिसत आहेत.

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधान मंत्री उज्ज्वला योजना - विकिपीडियाCylinderगॅस सिलेंडरthaneठाणे